जय किसान भाजी मार्केट मध्ये सोमवारी मिरचीचा दर प्रति किलो 80 रुपयांना जाऊन पोहोचला. आठशे रुपयांना दहा किलो मिरची अशा पद्धतीने मिरची उत्पादकांकडून मिरचीची खरेदी करण्यात आली. अडत व्यापारी अख्तर सनदी यांनी नेहमीच्या लिलाव आणि बोलीच्या माध्यमातून मिरची उत्पादकांना चांगला भाव मिळवून दिला आहे.
पावसाने हात दिलेला असताना भाजी उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलेले आहे अशा परिस्थितीत पिकलेल्या मिरचीला चांगला दर मिळवून देण्यात आल्यामुळे याची माहिती बेळगाव live ला उपलब्ध झाली आहे.या मिरचीच्या चांगल्या दरा संदर्भातील माहिती महत्वाची आहे.
बेळगाव शहराच्या भाजी मार्केटमध्ये भाजी उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळवून देण्याच्या बाबतीत पुढाकार घेण्यात येतो. दरम्यान सध्या मिरचीची आवक चांगली असतानाही मिरची उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध झाली.
बेळगाव येथील मिरची आंध्र प्रदेश हैदराबाद कर्नुल आदी ठिकाणी पाठवली जाते. बेळगाव आणि परिसरात पीकणाऱ्या मिरचीला अनेक ठिकाणी चांगली मागणी आहे. दरम्यान मिरची उत्पादकाला चांगला भाव मिळाल्याशिवाय उत्पादनाच्या बाबतीत शेतकरी पुढे होणार नाही,
ही बाब लक्षात घेऊन अडत व्यापाऱ्यांनी चांगला भाव मिळवून दिला असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे उत्पादकांमध्ये त्यांच्याबद्दल चांगली भावना व्यक्त होत आहे.