बेळगाव हिंदवाडी येथे बारा वर्षीय लहान मुलीचा अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या करणाऱ्या त्या युवकाला आरोपीला जेरबंद करण्यात टिळकवाडी पोलिसांना यश आले आहे.
हिंदवाडी येथे झालेला हा अपहरणाचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता त्यामुळे त्यानंतर जागे झालेल्या पोलिसांनी बुधवारी संशयित आरोपीला ताब्यात घेतले होते.
बुधवारी मुलीच्या पालकांची तक्रार आल्यानंतर टिळकवडी पोलिसांनी कारवाई सुरू केली, सीपीआय दयानंद शेगुनशी यांच्या देखरेखीखाली आयजीपी विकास कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सर्व माहिती गोळा करून मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या त्या युवकाला जेरबंद करण्यात यश मिळविले.
सदर मुलगी शिक्षण संपवून घरी जात असताना तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.बेळगाव मारुती नगर येथील रहिवासी ३५ वर्षीय युवक गजानन पाटील असे त्या आरोपीचे नाव आहे.
आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर टिळकवाडी पोलिसांनी वेगळ्या पद्धतीने तपास सुरू केला आहे. कालच बेळगाव live ने अपहरण करणाऱ्या युवकाला पोलिसांनी चौकशी साठी ताब्यात घेतले असल्याचे वृत्त दिले होते रात्री उशिरा चौकशी पूर्ण झाल्यावर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; संशयित पोलिसांच्या ताब्यात
बेळगावच्या हिंदवाडीतील घटना ,स्वतः चिमुरडीनेचं हाणून पाडला अपहरणाचा प्रयत्न घटना cctv मध्ये कैद#attemptkidnaping#cctvkidnap pic.twitter.com/c1YLbJmzSt
— Belgaumlive (@belgaumlive) July 12, 2023