Thursday, January 23, 2025

/

जायंट्स मेनचा निसर्ग संवर्धनासाठी अनोखा उपक्रम

 belgaum

बेळगाव लाईव्ह : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन या सेवाभावी संघटनेच्या वतीने नेहमीच अनेक वैविध्यपूर्ण असे उपक्रम हाती घेण्यात येतात. आज निसर्गाचा समतोल राखण्यासाठी त्याच्या संवर्धनासाठी वृक्षारोपण करणे अत्यंत गरजेचे असल्याचे लक्षात घेऊन या संघटनेने जंगलवाढीसाठी विविध बिया पेरण्याचा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमांतर्गत त्यांनी आंबोली आणि चंदगड तालुक्यातील वैजनाथ देवस्थानाच्या परिसरातील डोंगरदऱ्यात सिडबॉलच्या माध्यमातून बियांची पेरणी केली.

निसर्गाचा समतोल राखला जावा, यासाठी शासनही नेहमी प्रयत्नशील असते. आतापर्यंत खड्डे तयार करून त्यात बिया किंवा रोपटे प्रशासनामार्फत लावण्यात येत होते. बियांचा बॉलच तयार केला तर वृक्षलागवडीचा मोठय़ा प्रमाणात येणारा खर्च वाचतो असे अध्यक्ष सुनिल मुतगेकर यांनी सांगितले.

सिडबॉल तयार करताना माती आणि शेण समप्रमाणात घेऊन एकजीव केले जातात. पशुपक्ष्यांसाठी फळझाडे तसेच जंगली झाडाच्या बीया (सीड) घालून गोळा तयार केला जातो. गोळ्यांना छोटय़ा बॉलसारखा आकार देऊन हा सीड बॉल तयार झाल्यानंतर ते सुकवून ठेवला जातो. पावसाचा हंगाम सुरु होताच डोंगर परिसरात हे सीडबॉल टाकले जातात. नुसत्या बिया टाकल्या तर पक्षी, किडे, मुंग्या खाऊन टाकतील म्हणून सिडबॉल तयार करण्यात येतात असेही अध्यक्ष मुतगेकर यांनी सांगितले.

अनेक कारणांसाठी चोरटी जंगलतोड तसेच विकासाच्या नावाखाली वृक्षतोड होऊ लागल्याने वाढत्या प्रमाणात जंगले नष्ट होऊ लागली आहेत. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जंगलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. या भावनेतुन चारपाच वर्षापूर्वी जायंट्स नर्सरीची स्थापना करण्यात आली असून या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. या वर्षी काजू, फणस, आंबा, जांभूळ अशा विविध फळ बियांचे सिडबॉल बनवून ते जंगलामध्ये फेकण्याचा उपक्रम हाती घेतल्याचे मदन बामणे यांनी सांगितलेGiants event

सावंतवाडी तालुक्यातील आंबोली तसेच चंदगड तालुक्यातील देवरवाडी गावांतील जंगल भागात एक हजाराहून अधिक सिडबॉल फेकण्यात आले. जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष सुनिल मुतगेकर व त्यांच्या टीमने केलेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी त्या परिसरात जमलेल्या पर्यटकांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून छोटीशी फेरी काढण्यात आली या फेरीत सहभागी सदस्यांनी जायंट्सचा निर्धार निसर्ग करूया हिरवागार, हिरवागार हिरवागर निसर्ग करूया हिरवागार, झाडे लावा झाडे जगवा अशा घोषणा देऊन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

या आगळ्यावेगळ्या निसर्गसंवर्धन कार्यक्रमात अध्यक्ष मूतगेकर यांच्यासोबत माजी अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ,मदन बामणे, शिवराज पाटील,अशोक हलगेकर,उमेश पाटील,सचिव लक्ष्मण शिंदे, खजिनदार विजय बनसूर, उपाध्यक्ष अविनाश पाटील,अरुण काळे,
राजू जैन,आनंद कुलकर्णी, मंजुनाथ शिरोडकर, जयवंत पाटील, विश्वास पवार, मोहन पत्तार, गावडू पाटील, पद्मप्रसाद हूली, सुनिल पवार, सुनिल चौगुले, राहुल बेलवलकर,मधु बेळगांवकर, बाळकृष्ण तेरसे,भास्कर कदम, पुंडलिक पावशे,उमेश पाटील, महेश रेडेकर,प्रदीप चव्हाण, महादेव भस्मे,भाऊ बंडाचे ,सुभाष नांडवडेकर, मुकूंद महागावकर यांनी सहभाग नोंदवला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.