आयुर्वेद कॉलेज बेळगाव येथील शरीर शास्त्र विभागाचे प्राध्यापक डाॅ. महांतेश रामन्नावर यांना यंदाचा कर्नाटक भूषण -श्रेष्ठ वैद्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
विजापूर जिल्ह्यातील देवर हिप्परगी गावातील डॉ. रमेश राठोड चॅरिटेबल ट्रस्ट आणि कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघ शाखा देवर हिप्परगी यांच्यावतीने हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
मूळचे बैलहोंगलचे असलेल्या डॉ. महांतेश रामन्नावर यांनी देहदान चळवळीसाठी केलेले कार्य आणि जनसेवा लक्षात घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
कर्नाटक भूषण -श्रेष्ठ वैद्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डॉ. रामन्नावर यांचे आयुर्वेदिक महाविद्यालय आणि वैद्यकीय क्षेत्रासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.