आता मोसमाचा अंदाज योग्य ठरणारे पूर्वीचे दिवस गेले आहेत. जूनच्या प्रारंभी सुरू होणारा मान्सूनचा पाऊस यंदा जुलैच्या मध्याला खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे, जो या महिन्याच्या अखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.
यंदा मान्सून पूर्व पावसाने देखील निराशाजनक हजेरी लावल्यामुळे पाण्याच्या सर्व स्त्रोतांची पातळी अतिशय खालावली होती. गेल्या कांही वर्षांपासून बेळगावातील पावसाचे स्वरूप चिंताजनकरीत्या बदलले आहे. पूर्वी बेळगावात साधारण 7 किंवा 8 जून रोजी पावसाळ्याला सुरुवात होत होती. मात्र अलीकडच्या काळात यात मोठा फरक पडू लागला आहे. यंदा तर 15 जुलैनंतर पावसाळा सुरू झाला आहे. खऱ्या अर्थाने मान्सूनच्या पावसाला आता सुरुवात झाल्यामुळे सध्या आपण सर्वजण आनंदित झालो असलो तरी सर्वांसाठी ही आत्मपरीक्षणाची वेळ आहे. आज बुधवारी 19 जुलै रोजी कणकुंबी येथे 235 मि.मी., लोंढा येथे 152 मि.मी., एम. के. हुबळी येथे 181.9 मि.मी. आणि बेळगाव येथे 50.2 मि.मी. पाऊस नोंदविला गेला आहे. तसेच संपूर्ण जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पर्जन्यमापन केंद्राच्या ठिकाणी नोंदविला गेलेला पाऊस (अनुक्रमे पर्जन्यमापन केंद्र, जुलै महिन्यातील सर्वसामान्य पाऊस, 19 जुलै रोजीचा पाऊस आणि एकूण पाऊस यानुसार) खालील प्रमाणे आहे.
अथणी एचबीसी : 65 मि.मी., 16.6 मि.मी., 41.8 मि.मी.. बैलहोंगल आयबी : 129 मि.मी., 29.6 मि.मी., 75.6 मि.मी.. बेळगाव आयबी : 455 मि.मी., 50.2 मि.मी., 176.8 मि.मी.. चिक्कोडी : 134 मि.मी., 25.2 मि.मी., 88.0 मि.मी.. गोकाक : 68 मि.मी., 10.3 मि.मी., 46.5 मि.मी.. हुक्केरी एसएफ : 150 मि.मी., 16.7 मि.मी., 60.1 मि.मी.. कागवाड (शेडबाळ) : 68.5 मि.मी., 20.6 मि.मी., 45.2 मि.मी.. चिक्कोडी : 134 मि.मी., 25.2 मि.मी., 88.0 मि.मी.. खानापूर : 756 मि.मी., 80.2 मि.मी., 362.0 मि.मी.. कित्तूर : 270 मि.मी., 65.4 मि.मी., 133.5 मि.मी.. मुडलगी : 67 मि.मी., 16.3 मि.मी., 62.6 मि.मी.. निप्पाणी आयबी : 201.8 मि.मी., 26.8 मि.मी., 123.7 मि.मी.. रायबाग : 74 मि.मी., 13.0 मि.मी., 40.8 मि.मी.. रामदुर्ग : 64 मि.मी., 16.3 मि.मी., 40.8 मि.मी.. सौंदत्ती : 76 मि.मी., 19.6 मि.मी., 56.6 मि.मी..
मान्सूनचा पाऊस हा पाणी पुरवठ्याची कमतरता दूर करण्यासाठी आणि शेतीसाठी पोषक असतो. मात्र महिनाभर मुसळधार पडणारा हा पाऊस काही वेळेला आपत्तीजनकही ठरतो. ज्याची प्रचिती आपल्याला 2019 मधील पूर परिस्थितीच्या स्वरूपात आली आहे.
तेंव्हा आपल्याला हवामानातील प्रतिकूल बदल टाळावयाचे असतील तर निसर्ग आपल्याला दाखवत असलेल्या लक्षणांकडे आपण गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. त्या अनुषंगाने आपल्या पर्यावरणाचे जतन आणि पुनर्संचयन केले पाहिजे. त्याकरिता खास करून झाडेझुडपे वृक्ष वनस्पतींचे संरक्षण व संवर्धन केले पाहिजे.