बेळगाव लाईव्ह : संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या भारतातील चांद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण शुक्रवारी करण्यात आले. आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 2.35 वाजता एलव्हीएम3-एम-4 रॉकेटच्या माध्यमातून हे मिशन अवकाशात पाठवण्यात आले.
या मोहिमेत बेळगाव जिल्ह्यातील विविध भागातील अनेक शास्त्रज्ञ, तंत्रज्ञांचा समावेश असल्याची माहिती समोर येत असून या मोहिमेत निपाणी तालुक्यातील आडी येथील केरबा लोहार यांचाही सहभाग असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
चार वर्षांपूर्वी अवकाशात झेपावलेल्या चांद्रयान- 2 या मोहिमेतही केरबा लोहार यांचा सहभाग होता. त्यांच्या या कर्तुत्वाने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यासंदर्भात बोलताना शास्त्रज्ञ केरबा लोहार यांनी, चांद्रयान-2 या मोहिमेला यश मिळण्याची खात्री होती.
मात्र अखेरच्या टप्प्यात संपर्क तुटल्याने चांद्रयानाचे लँडिंग व्यवस्थित झाले नाही. त्यावेळच्या सर्व त्रुटींचा सखोल अभ्यास करून त्यावर आवश्यक चाचण्या आणि सराव गेल्या चार वर्षात करण्यात आला.
यानंतर चंद्रयान-3 हे अवकाशात झेपावले. त्यामुळे ही मोहीम पूर्णपणे यशस्वी होणार याची खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.
*… हा तर खानापूर साठीही अभिमानाचा क्षण*