बेळगाव लाईव्ह -आंबोली मार्गावर पाणी साचल्याने आणि बस चालवणे शक्य नसल्याने “बेळगाव-आंबोली धबधबा विशेष बस वाहतूक” तात्पुरती बंद करण्यात आली आहे त्यामुळे सहकार्य करण्याची विनंती वायव्य परिवहन मंडळाने केली आहे
गेल्या दोन दिवसांपूर्वी कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने गोकाक आणि आंबोली धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांना दर रविवारी विशेष बसची सोय करण्याची घोषणा केली होती परंतु पश्चिम घाटात आंबोली परिसरात पावसाळा जोर वाढल्याने रस्त्यावर आणि अनेक ठिकाणी पाणी साचले आहे दरडी कोसळण्याची शक्यता आहे त्यामुळे परिवहन मंडळाने विशेष सहल बस बस रद्द करण्याचे जाहीर केले आहे बेळगाव शहरातील पर्यटन याची नोंद घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे.
चिखले पारवाड आणि चिगुळे या खानापूर तालुक्यातील पर्यटनाला जाण्यास बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बंदी घातली आहे याशिवाय रेल्वे खात्याने आणि वन खात्याने दूध सागर धबधबा पाहायला जायला देखील बंदी आहे. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला असला तरी त्यांनी बेळगाव शहरातील किंवा जवळील परिसरातील ठिकाणी पर्यटनाचा आनंद लुटू शकतात.
बेळगाव शहरात जवळ या ठिकाणी करू शकता पर्यटन
जंगलात लांबच्या ठिकाणी खानापूर तालुक्यात किंवा दूध सागरला जाण्याऐवजी बेळगाव शहरातल्या शहरात देखील पर्यटन करण्याची संधी उपलब्ध आहेत. जर तुम्हाला पाऊस अनुभवायचा असेल तर कॅम्प परिसर, रेस कोर्स मैदान, वॅक्सिन डेपो आणि किल्ला परिसरातील झाडे असलेल्या ठिकाणी जाऊन बेळगावच्या पावसाचा आनंद घेऊ शकता.
शहरातील उंच ठिकाणावर असलेले राजहंसगड किल्ला हे देखील एक पर्यटन स्थळ म्हणून अलीकडच्या काळात प्रसिद्धीला आलेले आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांची सिंहासनाधिश मूर्ती आणि उंचीवर पडणाऱ्या पावसाचा आनंद घेण्यासाठी राजहंसगडचा देखील एक पर्याय म्हणून बेळगावकरांच्या समोर उपलब्ध आहे.
बेळगाव शहराजवळच कणबर्गी येथील प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिर आणि तेथील जंगल परिसरात देखील चांगल्या पद्धतीचा पर्यटन देवदर्शन होऊ शकते. कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील वैजनाथ चा डोंगर आणि वैजनाथ देवालय परिसरात देखील पसंतीत उतरण्यासारखे ठिकाण आहे.
#NWKRTC #Belagavi #AmboliFalls #SpecialBus#campBelgaum #vaccinedepot #fortrajhansgad
#Belgaumfort #shrisidheshwartemple
#vaijnathtemple
#Fort