बेळगाव लाईव्ह : कर्नाटक परिवहन खात्याने राज्यातील मोठ्या संख्येने प्रलंबित असलेली वाहतूक नियम भंगांची प्रकरणे निकालात काढण्यासाठी रहदारी ई -चलनांवर पुन्हा ५० टक्के सूट जाहीर केली आहे. वाहतूक नियम भंगासाठी झालेला ई -चलन दंड भरू इच्छिणाऱ्यांसाठी ही ऑफर येत्या ९ सप्टेंबर २०२३ पर्यंत लागू असणार आहे.
कर्नाटक परिवहन खात्याने यापूर्वी देखील या पद्धतीने दंडात सूट देण्याची ऑफर जाहीर केली होती. अनेकांनी पुढे होऊन या ऑफरचा लाभ घेत आपला ई -चलन दंड भरला होता.
आता पुन्हा ही ऑफर लागू करण्यात आली असून या ऑफरचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी आपला दंड आपल्या भागातील संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन अथवा कर्नाटक वन पोर्टलच्या माध्यमातून भरावयाचा आहे.
प्रलंबित असलेले आपले ई -चलन भरू इच्छिणाऱ्यांसाठी येत्या ९ सप्टेंबर २०२३ पर्यंत दंडात ५० टक्के सूट देणारी ही ऑफर लागू असणार आहे.