Tuesday, September 17, 2024

/

यश इव्हेंटस पुरस्कृत हॉकी प्रशिक्षण शिबिराची सांगता

 belgaum

केवळ हॉकी खेळण्यासाठीच नव्हे तर शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त होण्यासाठी तसेच विविध स्तरांवर स्वतःचे प्रतिनिधित्व सिद्ध करण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने हॉकी बेळगाव संघटनेतर्फे मुला-मुलींसाठी आयोजित मोफत हॉकी प्रशिक्षण सुभाषचंद्र बोस (लेले मैदान) टिळकवाडी येथे नुकतेच उत्साहात पार पडले. या शिबिराचा याचा लाभ ५० मुला-मुलींनी घेतला.

शिबिराचा सांगता समारंभ अध्यक्ष घुळाप्पा होसमनी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रारंभी प्रकाश कालकुंद्रीकर यांनी प्रास्ताविकात शिबिराची माहिती दिली. सचीव सुधाकर चाळके यांनी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले.

यावेळी अध्यक्षांच्या हस्ते हॉकी प्रशिक्षण शिबिराचे प्रायोजक यश इव्हेंटसचे संचालक अजिंक्य कालकुंद्रीकर व साजिद शेख यांचा पुष्पगुच्छ देऊन तसेच हॉकीपटू प्रथमेश सावंत व युवराज ताशीलदार यांचा हॉकी व चेंडू देऊन सत्कार करण्यात आला.

हॉकी बेळगांवच्या खेळाडू मृणाली भाटे, भावना कलघटगी, सीना पवार यांची १९ वर्षाखालील ज्युनियर नॅशनल कॅंप बेंगलोरसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचेही संघटनेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.

याप्रसंगी मनोहर पाटील, उत्तम शिंदे, नामदेव सावंत, एस एस नागरोटे, प्रशांत मंकाळे, श्रीकांत आजगांवकर, उपाध्यक्ष पूजा जाधव, विनोद पाटील, अश्विनी बस्तवाडकर, दत्तात्रय जाधव, सुरेश पोटे, विकास कलघटगी, अनिल राणे, अजय सातेरी आदीसह संघटनेचे सदस्य, हिताचिंतक व निमंत्रित उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.