belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकात शक्ती योजने अंतर्गत काँग्रेस सरकारने महिलांसाठी मोफत बसप्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मोफत बसप्रवासाची संधी उपलब्ध झाल्याने परिवहनच्या बसमध्ये महिलावर्गाची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

बेळगावमधील मध्यवर्ती बसस्थानकावर महिला प्रवासी मोठ्या संख्येने गर्दी करत असून काही जागरूक महिलांनी मोफत बसप्रवास नको तर बसप्रवासात सूट मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

कर्नाटकात काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या पाच हमी योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या पाच हमी योजनांपैकी एक असलेली योजना म्हणजेच शक्ती योजना. काँग्रेस सरकारने २०० युनिट मोफत वीज, कुटुंबातील प्रमुख महिलेला गृहलक्ष्मी योजने अंतर्गत प्रतिमहिना २००० रुपये, पदवीधर, डिप्लोमाधारकांना मानधन अशा अनेक सुविधा जाहीर केल्या आहेत.

यातील पहिल्या टप्प्यात शक्ती योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र शक्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी इतर खाजगी वाहतूक व्यवस्थेकडे पाठ फिरविली असून काँग्रेसच्या या योजनेविरोधात खाजगी प्रवासी वाहतूकदार संताप व्यक्त करत आहेत. काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर लगेचच वीजदरवाढ झाली.Women's

एकीकडे मोफत वीज देण्याचे आश्वासन तर दुसरीकडे सामान्य माणसाच्या खिशाला कात्री, एकीकडॆ मोफत बसप्रवास तर एकीकडे सिलिंडरचे वधारलेले दर अशा परिस्थितीत आपल्याला मोफत नको पण जीवनावश्यक वस्तूंची जी दरवाढ झाली आहे त्यासाठी सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी काही जागरूक महिलांनी आज सीबीटी येथे प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली आहे.

वाढत्या महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. अशात घर सांभाळणे हे एका सर्वसामान्य कुटुंबासाठी कठीण होत चालले आहे. राज्यात सत्तेवर आलेल्या नव्या काँग्रेस सरकारने सर्वसामान्यांच्या या अडचणींचा विचार करून मोफत सुविधा पुरवण्या ऐवजी सर्वसामान्यांच्या जगण्याला उपयोगी ठरतील, अशा योजना कार्यान्वित कराव्यात अशी मागणी आता सुज्ञ नागरिक करू लागले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.