बेळगाव लाईव्ह : उन्हाचा तडाखा आणि पावसाची हुलकावणी यादरम्यान शहरवासीय पाण्याच्या टंचाईच्या गंभीर समस्येला तोंड देत असताना बेळगावमध्ये विविध ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागण्याचे अनेक प्रकार अलीकडे झालेले समोर आले आहेत.
बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळीने तळ गाठल्याने शहरवासीयांना पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जाण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
अशातच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या नळ पाइपलाइनला गळती लागून पाणी वाया जात आहे. एकीकडे पाणी जपून वापरण्याचा सल्ला आणि दुसरीकडे अशापद्धतीने पाण्याचा अपव्यय अशा परिस्थितीत गंभीर पाणी टंचाई उद्भवली तर याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल नागरीकातून उपस्थित होत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या पाइपलाइनला लागलेल्या गळतीकडे कधी लक्ष पुरवणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
शहरात पाणी टंचाई….चक्क डी सी ऑफिस समोर पाणी गळती…ही पाण्याची नासाडी थांबणार का? pic.twitter.com/9crUcthZVt
— Belgaumlive (@belgaumlive) June 19, 2023