belgaum

बेळगाव लाईव्ह : ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे महत्व महिलावर्गाची विशेष असते. नवविवाहितेपासून प्रत्येक सौभाग्यवती या दिवसासाठी आतुरतेने वाट पाहत असते.

ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजऱ्या केल्या जाणाऱ्या वटपौर्णिमेसाठी बाजारात रानमेवा दाखल झाला असून महिलावर्गाने पौर्णिमेच्या आधी दोन दिवस खरेदीसाठी बाजारात गर्दी केली आहे.

वटपौर्णिमेसाठी आंबा, केळी, जांभूळ, फणस, करवंद किंवा रानमेवा अशा पाच प्रकारच्या फळांसह पूजेच्या साहित्याची आवश्यकता असते.

वटपौर्णिमेच्या औचित्याने बाजारपेठेत रानमेव्यासह पूजेचे साहित्य देखील मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून शुक्रवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात महिलांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.