Sunday, December 22, 2024

/

कॅम्पमधील भाऊ तिलारीत बुडाले

 belgaum

चंदगड तालुक्यातील हजगोळी येथील चाळोबा मंदिर परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या कॅम्प येथील खान कुटुंबियांवर काळाचा घाला पडला आहे. हजगोळी येथील तिलारी जलाशयाच्या बॅक वॉटरमध्ये दोघे भाऊ बुडाले असून रेहान अल्ताफ खान (वय 15) आणि मुस्तफा अल्ताफ खान (वय 12) अशी त्यांची नावे आहेत.

चंदगड पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार बेळगाव कॅम्प येथील अल्ताफ खान आपल्या पत्नी व दोन मुलांसह आज शनिवारी दुपारी चारच्या सुमारास हजगोळी येथील चाळोबा मंदिर परिसरात गेले होते.

याठिकाणी तिलारी जलाशयाचे बॅक वॉटर असते. त्या पाण्यात रेहान आणि मुस्तफा खेळत होते. पण, अचानक ते बुडाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत माहिती मिळताच चंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्यात शोधाशोध सुरू केली. पण, अंधार आणि पावसामुळे शोधकार्यात अडथळा आला. त्यामुळे आज शोध थांबवला असून रविवारी पुन्हा शोध घेण्यात येणार आहे.

दरम्यान घटनेची माहिती कळताच  गौस धारवाडकर सह कॅम्प भागातील अनेक सामाजिक कार्यकर्ते तिलारी धरण परिसरात दाखल झाले आहेत.

सध्या सुट्टीचा आनंद मिळवण्यासाठी पालक वर्ग आपल्या मुलांना अनेक पर्यटन स्थळांवर घेऊन जात असतात अश्यावेळी सावधानता बाळगणे गरजेचे बनले आहे. पावसात तर अनेक धबधबे नदी धरणे आदी ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत असते त्यावेळी सतर्कता बाळगण्याची गरज बनली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.