belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक सरकारकडून जारी करण्यात आलेल्या स्त्री शक्ती योजने अंतर्गत मोफत बससेवा योजनेचा शुभारंभ जिल्हा व तालुका स्तरावर रविवारी केला जाणार आहे.

बेळगाव आणि चिकोडी या दोन विभागाच्या मोफत स्त्री शक्ती योजनेचा शुभारंभ बेळगावच्या मध्यवर्ती बसस्थानकात जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि विविध मान्यवरांच्या उपस्थिती आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती वाहतूक नियंत्रण अधिकारी गणेश राठोड यांनी दिली आहे.

महिलांना प्रवास अनुकूल व्हावा यासाठी हि योजना सरकारने कार्यान्वित केली असून सरकारी आदेशानुसार व्यवस्थितरीत्या या योजनेचे अनुष्ठान केले जाणार आहे. बेळगावच्या मध्यवर्ती बसस्थानकावर दुपारी १२.०० वाजता या योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे.

या कार्यक्रमास उत्तर मतदार संघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ, उत्तर कन्नडचे खासदार अनंतकुमार हेगडे, चिक्कोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, बेळगावच्या खासदार मंगला अंगडी आदी प्रमुख मान्यवरांसह प्रादेशिक आयुक्त पी. सुनील कुमार, उत्तर विभागाचे महानिरीक्षक एन. सतीशकुमार, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील, हुबळी वायव्य परिवहन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक भरत एस, बेळगावचे वरिष्ठ विभागीय नियंत्रक गणेश राठोड, जीपीएमचे सीईओ हर्षल भोयर, महामंडळाचे आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, बेळगाव परिवहनचे प्रशासकीय मंडळ व कर्मचारी यांचा सहभाग असेल.

काँग्रेसच्या पाच हमी योजनेपैकी एक असलेल्या शक्ती योजनेच्या अंतर्गत रविवारपासून महिला राज्यात सामान्य परिवहन बसमधून कुठेही आणि कधीही मोफत प्रवास करू शकतात. चार महामंडळांच्या एसी बसे आणि एक्स्प्रेस बसेस वगळता सामान्य बसेसमध्ये प्रवास करू शकतात. बाहेरील राज्यांमध्ये चालणाऱ्या बसेसमध्ये मोफत प्रवास करण्याची परवानगी नाही. बसमधून मोफत प्रवास करताना महिलांनी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने जारी केलेले निवासी ओळखपत्र यापैकी कोणतेही एक ओळखपत्र आपल्यासोबत ठेवणे आवश्यक आहे. यासह या योजनेसाठी महिलांना स्मार्ट कार्ड देण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली असून नजीकच्या सायबर सेंटरमधून किंवा सेवा सिंधू पोर्टलद्वारे नोंदणी करून स्मार्ट कार्ड मिळवता येते. यासाठी देखील आधार कार्ड किंवा कोणत्याही निवासी ओळखपत्राच्या कागदपत्रांची आवश्यकता आहे. हे स्मार्ट कार्ड सरकारतर्फे मोफत देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.