बेळगाव लाईव्ह : वीज दरातील वाढ हि तात्पुरती करण्यात आली असून उद्योजकांनी महाराष्ट्रात स्थलांतर करण्याची गरज नसल्याचे बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
विजेचे दर कमी न केल्यास बेळगावचे उद्योगपती महाराष्ट्रात स्थलांतरित होण्याच्या विचारात आहेत अशा चारची सुरु आहे. याबाबत बोलताना सतीश जारकीहोळी यांनी एका दिवसात उद्योग महाराष्ट्रात जाऊ शकणार नाहीत, अशी टिप्पणी केली.
एखादा उद्योग स्थापन करण्यासाठी १० वर्षे लागतात, त्यासाठी किती मेहनत आणि पैसा लागतो. डबाबंद मालाचे दुकान असो किंवा चहाचे दुकान असे उद्योग एका दिवसात महाराष्ट्रात जाणार का,? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
वीजदरवाढ करण्यात सरकारचा थेट सहभाग नाही. हि बाब केईआरसीकडे असून वीजबिलात तिप्पट वाढ होऊ शकत नसल्याचे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
याप्रश्नी बैठक घेऊन लवकरच तोडगा काढण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. वीजदरवाढ हि केवळ कर्नाटक राज्यातच करण्यात आली नसून देशाच्या इतर भागातही झाली आहे. वीजबिल तीन पटीने वाढल्याचे सांगितले जात आहे. याबाबत आपणदेखील संभ्रमात असून लवकरच या प्रश्नावर तोडगा काढून प्रतिक्रिया व्यक्त करेन असे ते म्हणाले.