Friday, July 19, 2024

/

स्नेहा भोसले 42 कि.मी. मॅरेथॉनमध्ये अजिंक्य!

 belgaum

विश्वभारती कला क्रीडा फाउंडेशन आयोजित “कारगिल मॅरेथॉन -2023” ही धावण्याची शर्यत काल रविवारी उस्फुर्त प्रतिसादात पार पडली. सदर शर्यतीत स्नेहा भोसले, आकांक्षा गणेबैलकर, अमोल पंढरपूर, प्रतीक्षा कुंभार, राहुल सूर्यवंशी आणि कल्लाप्पा तिर्वीरकर या धावपटूंनी आपापल्या गटाचे विजेतेपद पटकावले.

“कारगिल मॅरेथॉन -2023” मध्ये 42 कि.मी. फुल मॅरेथॉन, 21 कि.मी. हाफ मॅरेथॉन, 10 कि.मी. मिनी मॅरेथॉन, त्याचबरोबर 3 कि.मी. फन रन आणि विकलांगांची मॅरेथॉन यांचा समावेश होता. मॅरेथॉनचे उद्घघाटन बेळगावचे एसपी शेखर बोरलिंगेसर व माजी महापौर नागेश सातेरी यांच्या हस्ते झाले.

ही शर्यत यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विश्व भारती कला क्रीडा फाउंडेशन भारती कला क्रीडा फाउंडेशनने अथक परिश्रम घेतले. तसेच बीएससी माॅलचे संचालक वेद सर, जमादार सर आणि रामांना सर यांनी धावपटू आणि स्वयंसेवकांसाठी तब्बल अडीच हजार टी-शर्ट पुरस्कृत केले होते. तसेच अनेक नामांकित व्यक्तींनी ही स्पर्धा संपन्न होण्यासाठी सढळ हाताने मदत केली. शर्यतीच्या विविध गटातील यशस्वी स्पर्धक खालील प्रमाणे आहेत.Merethon

42 कि.मी. मॅरेथॉन – 1) कु. स्नेहा भोसले, 2) प्राजक्ता मरगाळे. 21 कि.मी. मॅरेथॉन (महिला) – 1) कु. आकांक्षा गणेबैलकर, 2) कु. मीनाक्षी बरुकर. 21 कि. मी. मॅरेथॉन (पुरुष) – 1) कु. अमोल पंढरपूर, 2) सुरेश बळकुडी, 3) आकाश देसुरकर. 10 कि.मी मिनी मॅरेथॉन (मुली) – 1) प्रतीक्षा कुंभार, 2) पूजा हलगेकर, 3) सौंदर्य हलगेकर. 10 कि.मी मिनी मॅरेथॉन (मुले) – 1) राहुल सूर्यवंशी, 2) भूषण गुरव, 3) अल्लारक नदाफ. 21 कि. मी. (35 वर्षावरील गट) -1) कल्लाप्पा तिर्विरकर. टिळकवाडीतील लेले मैदानावर विकलांगांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत लक्ष्मी रायण्णावर, फकिरा कर्विंकूपा, सिधाप्पा पटगुडी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. या सर्व स्पर्धकाना सचिन गोरले बंडू केरवाडकर, बीएससीचे वेद आणि मुजावर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

कारगिल मॅरेथॉन -2023 यशस्वी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कोच वसंत गोखले, राष्ट्रीय कोच प्रा. बाळासाहेब कातके, उमेश थोपटे, अंकुश गुहे, बेळगावचे कोच लक्ष्मण कोलेकर आणि गोरे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. मॅरेथॉनसाठी विजय हॉस्पिटलचे मालक रवी पाटील आणि शिवसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून शिवसेनेने ॲम्बुलन्स सेवा दिली. सांगावचे कल्लाप्पा पाटील, भवानीनगर मंडोळी ग्रामस्थ, बेनाळी ग्रामस्थ, सावगाव ग्रामस्थ मंडळींनी स्वयंसेवकाचे काम करून शर्यतीला सहकार्य केले. या खेरीज मॅरेथॉनप्रसंगी विश्वभारती कला क्रीडा फाउंडेशन संघटनेचे अध्यक्ष अनिल देसाई सेक्रेटरी रवी बिरजे, संचालिका राजश्री तुडयेकर, संचालक दामोदर कंबरकर, विनोद गुरव, महादेव पाटील, कल्लापा पाटील, राजेश तुडयेकर आदी जातीने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.