महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत बांधकाम विभागाच्या विरोधात दाखल झालेल्या अनेक तक्रारींची मनपा आयुक्तांनी गंभीर दखल असून शहापूर येथील एका रस्त्याच्या भू-संपादन प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांनी महापालिकेच्या पाच अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
बेळगाव दक्षिण विभागातील दोन सहाय्यक कार्यकारी अभियंते, एक सहाय्यक अभियंता, एक कनिष्ठ अभियंता आणि एका व्यवस्थापकाला मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबनाच्या कारवाईची शिफारस नगर विकास खात्याकडे का केली जाऊ नये? असा सवाल आयुक्तांनी त्यांना केला आहे. या पाचही जणांना आता आयुक्तांच्या नोटिसीला उत्तर द्यावे लागणार आहे.
महापालिकेच्या बांधकाम विभागातील पाच जणांना एकाच वेळी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्यामुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे.
बेळगाव महापालिकेच्या या पाच अधिकाऱ्यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी करण्यात आली बेळगाव महापालिकेचा कारभार सुधारणार आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. मागील काही महिन्यांमध्ये बेळगाव महापालिकेत काम व्यवस्थित सुरळीत चालले नव्हते लोकांच्या मूलभूत समस्यांच्या सोडवण्यात देखील अधिकाऱ्यांना अपयश येत आहे नगरसेवकांचे म्हणणे देखील अधिकारी ऐकत नव्हते अशा आशयाच्या अनेक तक्रारी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी घेतलेल्या बैठकीत लोकांनी मांडल्या होत्या. त्यानंतर हरकत मध्ये आलेल्या जिल्हा प्रशासनाने मनपाच्या या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
अनेक वर्षे तळ टिकून बसलेल्या अधिकाऱ्यांची बदली करा असाही सूर त्या बैठकीत आणला होता या शिवाय लोकप्रतिनिधींचे हातचे बाहुले बनले असल्याचा आरोप अधिकाऱ्यांवर करण्यात आला होता आता हे अधिकारी कारणे दाखवा नोटिसीला काय उत्तर देणार ते बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.