Saturday, November 23, 2024

/

हेस्कॉम अभियंत्यांच्या घरावर धाड

 belgaum

बेळगावातील अभियंत्याच्या घरावर लोकायुक्तांची धाड पडली आहे. रामतीर्थ नगर बेळगाव येथे हेस्कॉम कार्यकारी अभियंते शेखर बहुरूपी यांच्या घरावर धाड टाकण्यात आली आहे.

शेखर बहुरूपी हे विजापूर जिल्ह्याच्या हरपनहळळी येथे अभियंता म्हणून कार्यरत होते.

बहुरूपी हे 2019 साली अथनी येथे सेवा बजावत असतेवेळी पुर ग्रस्त घोटाळ्यात त्यांना निलंबित करण्यात आले होते.

अधिकाऱ्यांनी सकाळी सकाळी धाड टाकून बेकायदेशीर संपत्ती शोधायला सुरुवात केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.