belgaum

सीएससी केंद्रांना सेवासिंधू सुविधा उपलब्ध करा

सरकारी योजनांचा लाभ लोकांच्या दारात पोहोचवण्यात सीएससी केंद्रांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे राज्य सरकारने यापूर्वीच राबविलेल्या लोकप्रिय योजनांच्या अर्जांना सेवासिंधूमध्ये परवानगी देण्यात आली आहे, त्याचप्रमाणे सेवासिंधूमध्ये ग्रामवन आणि कर्नाटक वन केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सीएससी केंद्रांना ती देण्याची मागणी करण्यात आली आहे.

शासनाने केवळ ग्रामीण भागातील ग्रामवन व शहरी भागात कर्नाटकवन यांच्या माध्यमातून गॅरंटी योजना उपलब्ध करून दिले आहे. सेवासिंधू ही सर्विस कॉमन सर्विस सेंटरच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावे असे निवेदन काँग्रेस कार्यालयात महिला बालकल्याण मंत्री हेबाळकर यांना बेळगाव डिस्टिक डिजिटल कॉमन सर्विस सेंटर कडून देण्यात आले.

यावेळी सीएससी जिल्हा व्यवस्थापक मल्लिकार्जुन करेरुद्रनवर आणी सुनील जाधव यांनी मंत्री महोदयांना सांगितले की,सीएससी केंद्रातून सेवा सिंधू पोर्टल कोणत्याही मध्यस्थाशिवाय सामान्य सेवा केंद्राद्वारे वितरित केले जाऊ शकते आणि ती सरकार आणि लोक यांच्यातील दुवा म्हणून काम करत आहे. लोक कोणत्याही अडचणीशिवाय जवळच्या केंद्रावर शासकीय सेवांसाठी सहज अर्ज करू शकतात.

केवळ ग्रामीण भागातील ग्रामवन व शहरी भागात कर्नाटकवन यांच्या माध्यमातून गॅरंटी योजना शासनाने उपलब्ध करून दिलीआहे.जर का
राज्य शासनाने सेवासिंधू ही सर्विस कॉमन सर्विस सेंटरच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली तर कॉमन सर्विस सेंटरच्या माध्यमातून सेवा सिंधू पोर्टलचा वापर करून, एखादी व्यक्तीला त्यांच्या घरातील सोयीनुसार आवश्यक सेवांसाठी अधिकृत नोंदणी असलेल्या ऑनलाइन सेवा केंद्राच्या दुकानातून अर्ज करू शकतात.

बेळगाव शहरात निवडक ठिकाणी कर्नाटक वन पोर्टल उपलब्ध असल्यामुळे शासनाच्या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी जनसामान्य नागरिकांना लांब रांगेत उभे राहावे लागत आहे.त्यात सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण होत आहे. याचा शासनाने विचार करावा

जर का कॉमन सर्विस सेंटर माध्यमातून सेवा सिंधू सर्व्हर उपलब्ध झाल्यास सहजपणे जनसामान्य नागरिकांना अर्ज कोठेही करता येईल. जे सर्व विभागांमधील सेवा केंद्राच्या माध्यमातून सेवांसाठी सिंगल विंडो म्हणून कार्य करत आहेत. एखादी व्यक्ती सेवांसाठी ऑनलाइन अर्ज भरत असेल आणि नंतर जवळच्या केंद्राचा शोध घेऊन तेथे तो कागदपत्रे जमा करू शकेल.

एखाद्याला कॉमन सर्विस सेंटरच्या माध्यमातून सिंधू सेवांच्या साठी फॉर्म भरण्याची राज्य शासनाने परवानगी उपलब्ध करून दिली जावी अशी मागणी बेळगाव डिस्टिक मॅनेजर मलिकार्जुन करेरुद्ररान्नवर असोसिएशनचे अध्यक्ष रामचंद्र बदरगडे सरचिटणीस सुनील जाधव उपाध्यक्ष समिउल्ला मुल्ला,संचालक मृत्युंजय मंत्रनावर हमिद इनामदार कामांना चौगुले, संजय मैशाळे,शकील मुल्ला यासह अन्य संघटनेचे पदाधिकारी व सभासद उपस्थितीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.