राज्यातील विधानसभा निवडणूक आणि आचारसंहितेमुळे केईआरसीला दरवर्षीप्रमाणे गेल्या आर्थिक वर्षाअखेर वीज दर पत्रक जाहीर करता आले नाही. परिणामी त्यावेळच्या दोन महिन्यात झालेली दरवाढ आणि मार्च मधील उच्च ऊर्जा खरेदी यांच्या प्रभावामुळे सध्याची वीज दरवाढ अवास्तव वाटत आहे.
त्यामुळे अपेक्षा आहे की त्यानंतरच्या महिन्यांचे बिल तुलनात्मकरित्या कमी येईल, असा जाहीर खुलासा राज्याच्या ऊर्जा खात्याने अवास्तव वीजदर वाढीसंदर्भात केला आहे.
भारतीय वीज कायद्यानुसार सर्व राज्यांनी वीज वितरण कंपन्यांचे नियमन आणि वीज दर निश्चितीसाठी वीज नियामक आयोगाची स्थापना करणे आवश्यक आहे. त्यानुसार कर्नाटक वीज नियमक आयोगची (केईआरसी) 2002 मध्ये स्थापना करण्यात आली. केईआरसीकडून दरवर्षी राज्यातील 5 वीज वितरण कंपन्यांकडून (इस्कॉम्स) वीज दर निश्चिती केली जाते.
वीज दरातील अपेक्षित परताव्या संदर्भात इस्कॉम्स दरवर्षी नोव्हेंबरमध्ये केईआरसी समोर प्रस्ताव ठेवत असते. या प्रस्तावाचा अभ्यास केल्यानंतर आणि सर्व भागधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर तसेच त्यासाठी जनतेला विश्वासात घेऊन आर्थिक वर्षाअखेर 1 एप्रिलच्या सुरुवातीला केईआरएस विजेचे दर पत्रक ठरवते आणि अधिसूचित करते. मात्र यंदा विधानसभा निवडणुकीमुळे केईआरसीला दर पत्रक अधिसूचित करण्यास उशीर झाला ते गेल्या 12 मे 2023 रोजी अधिसूचित झाले.
राज्यातील नवे सरकार 20 मे 2023 रोजी अस्तित्वात आले आणि नव्या सरकारला वीजदर पत्रकाबद्दल अधिसूचित करण्याचा तो कालावधी होता. त्यामुळे सुधारित वीज दर पत्रकाची अंमलबजावणी जून 2023 मध्ये येणाऱ्या बिलामध्ये करण्यात आली. पुढील दोन घटकांमुळे जून महिन्यात आलेले विजेचे बिल अवास्तव वाटत आहे. 1) दोन महिन्यात वाढलेल्या वीज दराचा प्रभाव, 2) गेल्या मार्च 2023 मधील उच्च ऊर्जा खरेदीचा प्रभाव. अपेक्षा आहे की त्यानंतरच्या महिन्यांचे बिल तुलनात्मक दृष्ट्या कमी येईल. घरगुती वीज ग्राहकांसाठी सरकारने देखील जुलैमधील घरगुती विजेचे बिल 1 ऑगस्ट 2023 पासून गृह ज्योती योजनेअंतर्गत आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच ग्राहकांच्या वास्तवपूर्ण तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांचे निवारण करावे अशी सूचना इस्कॉम्सला करण्यात आली आहे. याखेरीज घरगुती वीज ग्राहकांना आपल्या बिलाची थकबाकी गृहज्योती योजनेचा एक भाग म्हणून येत्या सप्टेंबर 2023 पर्यंत भरण्याची सूट असेल. या पद्धतीने राज्याच्या ऊर्जा खात्याने सध्याच्या वीज दर वाढीबाबत जाहीर खुलासा केला आहे.