Monday, December 30, 2024

/

राज्यातील पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपाधिक्षकांच्या बदल्या

 belgaum

बेळगाव लाईव्ह : राज्यातील विविध जिल्ह्यातील पोलीस विभागातील पोलीस निरीक्षक आणि पोलीस उप अधीक्षकांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. राज्यातील सुमारे २९२ पोलीस निरीक्षक आणि ५१ पोलीस उप अधीक्षकांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले असून बेळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस विभागातील पोलीस निरीक्षक आणि पोलीस उप अधीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.

यामध्ये बेळगाव उत्तर पोलीस विभागातील पोलीस निरीक्षक नागय्या काडदेवर यांची बदली हुबळी पूर्व विभागात, आयजीपी कार्यालयातील पोलीस निरीक्षक ह्सनसाब डी. मुल्ला यांची रायबाग पोलीस स्थानकात, सीसीबी पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक अल्ताफ एच मुल्ला यांची हुबळी धारवाड सीसीबी पोलीस स्थानकात, पीटीएस खानापूर विभागाचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ यांची बेळगाव एपीएमसी पोलीस स्थानकात, बैलहोंगल पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक शिवशंकर गनाचारी यांची पोलीस मुख्यालयात, सीसीआरबी बेळगाव शहर विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीनिवास हंडा यांची बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात, निपाणी पोलीस स्थानक पोलीस निरीक्षक सिद्दबसवनगौड पाटील यांची धारवाड जिल्ह्यातील गरग पोलीस स्थानकात, कॅम्प पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नचिकेत जनगौडा यांची विजापूर जिल्ह्यातील डीएसआरबी पोलीस स्थानकात, एपीएमसी पोलीस स्थानकाचे रमेश आवजी यांची विजापूर जिल्ह्यातील सीईएन पोलीस स्थानकात, महिला पोलीस स्थानकातील रायगौंडा जनर यांची विजापूर महिला पोलीस स्थानकात बदली करण्यात आली आहे. तर बेळगाव उत्तर पोलीस विभागात श्रीशैल गाबी, खडेबाजार पोलीस स्थानकात दिलीप निंबाळकर, कित्तूर चौक पोलीस स्थानकात महांतेश होसपेटे, संगमेष शिवयोगी यांची निपाणी पोलीस स्थानकात, संजीव कांबळे यांची सीईएन पोलीस स्थानकात, बी. आर. गड्डेकर यांची सीईएन पोलीस स्थानकात बदली करण्यात आली आहे. यासह इतर अनेक पोलीस निरीक्षकांची बेळगावमधून इतर ठिकाणी आणि विविध जिल्ह्यातून बेळगावमध्ये पोलीस निरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे.

याचप्रमाणे बेळगाव ग्रामीण उपविभागातील पोलीस उप अधीक्षक गोपालकृष्ण गौडर यांची बेंगळुरू शहर रहदारी पश्चिम विभागात, मार्केट उपविभागातील प्रशांत सिद्दनगौडार यांची राज्य गुप्तहेर विभागात, बेळगाव जिल्ह्या डीसीआरबी विभागाचे जेम्स लॉय झेवियर यांची कलबुर्गी आयजीपी कार्यालयात बदली करण्यात आली आहे. तर एस. पी गिरीश यांची बेळगाव ग्रामीण उपविभाग, नारायण बरमणी यांची मार्केट उपविभाग, विरेश दोडामानी यांची बेळगाव डीसीआरबी विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.