गेल्या महिन्यात बेळगाव सीमाभागात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीची झालेली पिछेहाट याची कारण मिमांसा करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे बेळगावचा दौरा करणार आहेत.
रविवारी मुंबई मुक्कामी महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे इंजिनिअर सेलचे राज्य समन्वयक अमित देसाई यांनी पवार यांची भेट घेतली त्यावेळी पवार बोलत होते.
यावेळी बेळगावातील विधानसभा निवडणुकीच्या एकंदर झालेल्या घडामोडी याचा परामर्श सध्य परिस्थितीचा आढावा घेत पराभवा बद्दल चिंता व्यक्त केली आणि समितीची झालेली पडझड थांबवण्यासाठी नेमक्या सीमाभागातील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी लवकरच बेळगावचा दौरा करणार असल्याचे सांगितले.
अमित देसाई यांच्या नेतृत्वात भेटलेल्या इंजिनिअर सेलच्या शिष्टमंडळाने पवार यांना
इंजिनिअरिंग सेल आणि बेळगाव विधान सभा निवडणूक अहवाल दिला.
यावेळी पवार यांच्या “लोक माझे सांगाती” या आत्मचरित्राचे पवारांच्या स्वाक्षरीसह वितरण करण्यात आले.यावेळी विक्रम पाटील,योगेश बोराडे,रुपेश सिंघवी,संकेत देशपांडे,अमृता काळदाते,प्रवीण गाढवे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी इंजिनियरिंग सेलचे राज्य समन्वयक अमित देसाई यांनी घेतली शरद पवारांची भेट
बेळगावातील विधान सभेच्या समितीच्या पराभवावर शरद पवार यांनी व्यक्त केली चिंता घेतला सध्य स्थितीचा आढावा.
@PawarSpeaks@rautsanjay61 @Jayant_R_Patil @RRPSpeaks pic.twitter.com/P6StK9WMOb— Belgaumlive (@belgaumlive) June 18, 2023