Saturday, November 23, 2024

/

नव्या आमदारांवर अपात्रतेचा आरोप

 belgaum

बेळगाव लाईव्ह : विधानसभेवर निवडून आलेले नवे आमदार आणि मंत्री महोदयांनी राज्य घटनेच्या नियमानुसार शपथ घेतली नाही यामुळे या आमदार आणि मंत्र्यांना अपात्र ठरवा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते व उत्तर कर्नाटक संघर्ष समितीचे अध्यक्ष भीमाप्पा गडाद यांनी केली आहे.

विधानसभेत ५३ नवे आमदार आणि ९ मंत्र्यांनी संविधानानुसार शपथ घेतलेली नाही. संविधानविरोधी शपथ घेतलेल्या आमदार आणि मंत्र्यांना अपात्र ठरवा अशी मागणी गुरुवारी शहरातील कन्नड साहित्य भवनात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केली आहे.

नवे सरकार स्थापन करताना अनेक आमदारांनी आपल्या मनाला येईल त्यांच्या नावाने शपथ घेतली असून हे घटनाबाह्य आहे. आमदार किंवा मंत्र्यांनी शपथ घेण्यासाठी घटनेत विहित नमुना देण्यात आला आहे. मात्र घटनेतील नियमांची पायमल्ली करत ५३ आमदारांनी शपथ घेतली आहे.

शपथविधीनंतर त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत आजवर घेतलेल्या बैठका आणि त्यादरम्यान घेतलेले निर्णयदेखील रद्दबातल ठरवावेत अशीही मागणी भीमाप्पा गडाद यांनी केली आहे.

मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी किंवा कोणतीही पात्रता नसताना किंवा अपात्रता असताना सदस्य म्हणून बसणे हे घटनेच्या विरोधात आहे. संविधानानुसार शपथ न घेतलेल्या आमदार व मंत्र्यांना अपात्र ठरवले पाहिजे,

तसेच त्यांना मिळणाऱ्या सर्व शासकीय सुविधांमध्ये कपात करावी, नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. या आमदारांना व मंत्र्यांना अपात्र ठरवण्यासाठी विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपालांना पत्र लिहिण्यात आल्याचेही भीमाप्पा गडाद यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.