Wednesday, December 25, 2024

/

भुतरामहट्टी प्राणिसंग्रहालयात नवा पाहुणा येणार

 belgaum

बेळगाव लाईव्ह : प्राणीप्रेमींसाठी पर्वणी ठरलेल्या भूतरामहट्टी येथील मिनी प्राणिसंग्रहालयात नवी वाघीण दाखल होणार आहे, यामुळे प्राणीप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी आणखी एक पर्वणी उपलब्ध होणार आहे.

सुमारे ३१.६८ हेक्टर प्रदेशात पसरलेल्या या प्राणिसंग्रहालयात सिंह, बिबट्या, अस्वल, हायना, मोर, कबूतर, पोपट आणि विविध पक्षी यांसारख्या इतर वन्य प्राण्यांचा समावेश आहे. आता या प्राणी – पक्ष्यांमध्ये आणखी एका नव्या प्राण्याचा समावेश होणार असून बन्नेरघट्टा या राष्ट्रीय उद्यानातील वाघिणीला बेळगावच्या भूतरामहट्टी येथील मिनी प्राणी संग्रहालयात आणण्यात येणार आहे. या वाघिणीला भूतरामहट्टी येथे आणण्यात आल्यानंतर प्राणिसंग्रहालयातील वाघांची एकूण संख्या चार इतकी होणार आहे. या प्राणिसंग्रहालयात २०० विविध प्रकारचे पक्षी आणि लहान प्राणी आहेत, तर दोन सिंह, तीन वाघ, ३ बिबट्या, ४ हायना, २ अस्वल, ३ मगर, ३ सांबर, ४० हरीण आणि ४० काळवीट असे प्राणी आहेत. विशेष म्हणजे, उत्तर कर्नाटकात म्हणजेच बेळगावमधील मिनी प्राणिसंग्रहालयात प्रथमच टायगर सफारी जनतेला पाहण्यासाठी खुली होणार आहे. सर्व प्राण्यांचे नैसर्गिक अधिपत्याखाली निरीक्षण करण्याची संधी प्राणीप्रेमींना मिळणार आहे. शिवाय शैक्षणिक सहलींसाठीदेखील प्राणिसंग्रहालयाची सफर विद्यार्थ्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.