Wednesday, May 8, 2024

/

मलप्रभेचे पावित्र्य धोक्यात; नगरपालिकेने लक्ष देण्याची मागणी

 belgaum

खानापूर गावातील सांडपाण्याच्या नदीपात्रातील निचऱ्याकडे आणि पात्राच्या साफसफाईकडे नगरपालिकेने केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सध्या मलाप्रभा नदीपात्रात दुर्गंधीयुक्त सांडपाण्यासह केरकचरा, घाण आणि टाकाऊ साहित्य मोठ्या प्रमाणात जमा होऊन नदीला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. नदीचे पावित्र्य नष्ट होत असल्यामुळे स्थानिकांसह त्या ठिकाणी विविध धार्मिक विधी करण्यास येणाऱ्या परगावच्या नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

खानापूर तालुक्याची ओळख आणि भूषण असलेल्या मलप्रभा नदीला तेथील नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे दरवर्षी एप्रिल -मे महिन्यात वाईट दिवस येतात. कारण पावसाअभावी पाणी कमी झाल्यामुळे खानापूर गावानजीक नदीपात्रातील घाण -केरकचरा आणि टाकाऊ साहित्य उघड्यावर पडते. आजतागायत अधेमधे पडणाऱ्या वळीव पावसामुळे नदीपात्रात कायम थोडेफार पाणी असायचे.

परिणामी पात्रातील अस्वच्छता फारशी निदर्शनास येत नव्हती. मात्र यंदा म्हणावा तसा पाऊसच झाला नसल्यामुळे मलप्रभेचे पात्र पूर्णपणे कोरडे पडले आहे. कोरड्या पडलेल्या पात्रामुळे सध्या नदीवर बांधण्यात आलेल्या नव्या पुलाच्या ठिकाणी घाण -केरकचरा, टाकाऊ साहित्य आणि सांडपाणी मोठ्या प्रमाणात साचलेले दिसून येत आहे.Drainage water malprabha

 belgaum

खानापूरात नगरपालिकेकडून अद्यापही भूमिगत गटार योजना (ड्रेनेज) राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे गेली वर्षानुवर्ष गावातील सांड पाण्याचा व्यवस्थित अन्यत्र निचरा करण्याऐवजी ते थेट मलप्रभेत सोडले जाते. याखेरीज नदीपात्रात वाळू उपसा केला जातो. त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रांचे ऑइल व घाण नदीत मिसळत असते.

दरवर्षी या दिवसातही नदीला पाणी असल्यामुळे ते सर्व वाहून जात होते. मात्र यंदा पुरेसा पाऊस न झाल्यामुळे कोरड्या पडलेल्या पात्रात नव्या पुलाच्या ठिकाणी आम्ही केरकचरा घाणीसह प्रचंड सांडपाणी साचून नदीचे पवित्र्य धोक्यात आले आहे.

सुदैवाने यंदा मान्सूनचे आगमन लांबले आहे. तेंव्हा खानापूर नगरपालिकेने आत्ता तरी जागे होऊन जोरदार पावसाला सुरुवात होण्यापूर्वी युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवून मलप्रभेतील घाण, केरकचरा व सांडपाण्याचे उच्चाटन करावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.