Friday, April 26, 2024

/

मंत्री सतीश जारकीहोळींचा भाजपाला टोला

 belgaum

बेळगाव लाईव्ह : काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत कारभाराची भाजपाला काळजी करण्याची गरज नाही, सरकारचा कारभार नीट होत नसेल तर खुशाल त्यांनी टीका करावी, आमच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आमचे नेतेच सोडवतील. आमच्या पक्षातील अंतर्गत प्रश्नांवर भाजपने फारसे कष्ट घेण्याची गरज नाही असा टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी लगावलाय.

बेळगावमध्ये ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.हिंदुत्ववादी लेखक आणि वक्ते चक्रवर्ती सुलिबेले यांनी कर्नाटक सरकारची हिटलरच्या राजवटीशी तुलना करून केलेल्या टिप्पणीचा समाचार घेत चक्रवर्ती सुलिबेले हे नेहमीच निरर्थक गोष्टींवर चिथावणीखोर मुद्द्यांवर बोलून जातीय आधारावर समाजात फूट पाडत असल्याचा आरोप सतीश जारकीहोळी यांनी केला. राज्यात जातीय सलोखा बिघडविण्याचे काम सुरू ठेवल्यास तुरुंगात टाकू असा इशाराही जारकीहोळी यांनी दिला.

यावेळी गोहत्या बंदीबाबत देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. गोहत्या बंदीबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे ते म्हणाले. घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे समस्या निर्माण होऊ नयेत, असे सांगून बेळगाव नागरी विकास प्राधिकरणातील गैरप्रकारांची चौकशी करण्यात येईल. असेही ते म्हणाले.

 belgaum

बेकायदेशीर कामात स्थानिक आमदारांनी हस्तक्षेप केला आहे. अधिकाऱ्यांनी योग्य ती कागदपत्रे दिल्यास निश्चितपणे कारवाई केली जाईल. योग्य काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना जिल्ह्यातून ‘गेटपास’ देण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.