मानवी निलजकर या चिमूरडीने केला ‘हा’ विक्रम

0
7
Manavi mirajkar
 belgaum

फुलबाग गल्ली येथील कु. मानवी भरत निलजकर या जवळपास 3 वर्षाच्या चिमूरड्या बालिकेने अवघ्या 5 मिनिटात तब्बल 24 बडबड गीतांच्या सुरुवातीच्या कांही ओळी गाऊन इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये अल्पावधीत तीन भाषातील सर्वाधिक बडबड गीते गाण्याचा विक्रम नोंदविला आहे.

मानवी ही मुळचे फुलबाग गल्ली मात्र सध्या नानावाडी केएसबी कॉलनी येथे वास्तव्यास असलेले भारत आणि लक्ष्मी निलजकर यांची कन्या आहे. सध्या मानवीचे वय 2 वर्ष 11 महीने इतके असून शिक्षणाचा श्री गणेशा करण्यासाठी तिला नुकताच बालवाडीत (एलके नर्सरी) प्रवेश मिळाला आहे.

गाण्याची आवड असलेल्या मानवी हिने आपल्या आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली अनेक बडबड गीते तोंडपाठ केली आहेत. तिला ती इतकी तोंडपाठ आहेत कीManavi mirajkar

 belgaum

17 इंग्रजी, 5 हिंदी आणि 2 मराठी अशी एकूण 24 बडबड गीतांच्या सुरुवातीच्या कांही ओळी अवघ्या 5 मिनिटात गाऊन नुकताच तिने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये अल्पावधीत सर्वाधिक बडबड गीते गाण्याचा विक्रम नोंदविला आहे.

सदर पराक्रमाबद्दल मानवी भरत मिरजकर तिच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.