कोनवाळ गल्ली येथी नाल्याची महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांनी पाहणी करून अधिकार्यांना लवकरात लवकर नाले सफाई करण्याच्या सूचना केल्या.
पावसाळा तोंडावर आला तरी नालेसफाई झालेली नाही. त्यामुळे बुधवारी (दि. 21) महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील यांनी सकाळी कोनवाळ गल्ली, शिवाजी रोड येथील नाल्याची पाहणी केली. या नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचत आहे.
कॅण्टोन्मेंट परिसरातून कचरा येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. या नाल्यामुळे 2019 मध्ये कोनवाळ गल्ली जलमय झाली होती. त्यामुळे यावेळी पावसाला सुरवात होण्यापूर्वीच नाला सफाई करण्यात यावी, अशा सूचना करण्यात आल्या.
यावेळी नगरसेवक संतोष पेडणेकर, जयतीर्थ सौंदत्ती यांनीही महापौर, उपमहापौरांकडे तक्रारी केल्या. अधिकार्यांनी लवकरात लवकर या परिसरातील विकास कामांना चालना द्यावी, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.
पावसाळा सुरू होण्याच्या उंबरठ्यावर आहे मात्र अद्याप मनपाने नाले सफाई केलेली नाही मागील काही वर्षात शास्त्री नगर भागातील नाल्यात कचरा साचल्याने आसपासच्या परिसरात घरातून पाणी शिरले होते नेमकी तिचं परिस्थिती कोनवाळ गल्लीतील नाला परिसरातील देखील आहे त्यामुळे केवळ पाहणी आणि सूचना न करता प्रत्यक्षात काम कधी सुरू होणार गाळ कधी काढणार हा प्रश्न आहे