बेळगाव लाईव्ह : पारंपारिक पिकांसह फळभाजी पिकवून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत बेळगावच्या हलगा येथील शेतकऱ्याने यश मिळविले आहे.
हलगा येथील प्रगतशील शेतकरी मारुती बाबूली संताजी या शेतकऱ्याने १५ गुंठ्यात दुर्वा वांग्याचे पीक घेतले आहे. या पिकातून त्यांनी १ लाख ५० हजारांचे उत्पन्न मिळवत इतर शेतकऱ्यांसमोर उदाहरण उभे केले आहे.
हे पीक घेण्यासाठी त्यांनी खताचा योग्य वापर करत १० दिवसांच्या अंतरावर पिकाला पाणीपुरवठा केला. यासह कीटकनाशकाची फवारणीही केली.
रोप लागवडीच्या माध्यमातून फेब्रुवारीमध्ये त्यांनी या पिकाचे रोपण केले. आजपर्यंत त्यांनी या पिकाच्या माध्यमातून १.५० लाखांचा नफा मिळविला आहे.
बेळगावमध्ये पिकणाऱ्या या वांग्याला बेळगावसह गोवा, भटकळ, सावंतवाडी, मुंबई आदी ठिकाणी मोठी मागणी आहे.