बेळगाव लाईव्ह : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यावतीने रिंग रोड सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना कडोली, गुंजेनट्टी, देवगिरी आदी गावातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध करत सळो कि पळो करून सोडले. शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असूनही कडोली, गुंजेनट्टी, देवगिरी या भागात रिंगरोड सर्व्हे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी चांगलाच जाब विचारून त्यांना पिटाळून लावले आहे.
बुधवारी घडलेल्या या प्रकारामुळे रिंगरोडला शेतकऱ्यांचा विरोध असतानाही प्रशासनाकडून शेतकऱ्यांना डावलून सर्व्हे करण्याचे कामकाज सुरू केल्याने शेतकरीवर्ग संतप्त झाला आहे. सर्व्हे करण्यासाठी कडोली, गुंजेनट्टी, देवगिरी येथे अधिकारी आल्याची बाब शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली आणि यावेळी या भागातील शेतकऱ्यांनी एकत्रित जमून अधिकाऱ्यांना तीव्र विरोध करत जाब विचारला.
आपल्याला नोटीस न देता सर्वेक्षण करण्यात येत असून अशापद्धतीने शेतकऱ्याचा विरोध डावलून रिंगरोड चे सर्वेक्षण करण्यात येत असेल तर या भागातील समस्त शेतकरी आपल्या कुटुंबासमवेत, जनावरांसमवेत आणि बैलगाड्यांसह विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरतील, आणि आमच्या या भूमिकेला सामोरे जाऊन रिंग रोड चे काम सुरु करावे, असे आव्हान शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
रिंगरोड प्रस्तावाला शेतकऱ्यांनी यापूर्वीच आपला विरोध दर्शविला आहे. रिंगरोडमध्ये शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जाणार आहेत, त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. रिंगरोडला शेतकऱ्यांचा कायम विरोध आहे, असा ठाम निर्धार शेतकऱ्यांनी केला असून आज आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी सळो की पळो करून सोडले आहे.
यावेळी ऍड. शाम पाटील, अरुण कटांबळे, राजू मायाण्णाचे, बसवंत मायाण्णाचे, ऍड. कमलेश मायाण्णाचे, शिवाजी कुट्रे, सुनील पावणोजी, परशराम पाटील, सूर्याजी कुट्रे, मारुती मानमोडे, मोनाप्पा दावतार, जोतिबा पाटील, महादेव पाटील, सदानंद सनदी – तलवार, सिद्दप्पा तलवार, दीपक मानमोडे, रवी पाटील, प्रकाश पाटील, शिवाजी कुट्रे, सचिन जाधव, श्रीधर बाबली, सुभाष कुट्रे, तानाजी कुट्रे, बाळू बायनाईक, यल्लाप्पा जाधव, ओंकार जाधव, कल्लाप्पा कुट्रे, शंकर नाईक, कृष्ण मस्कार, सूर्याजी कुट्रे, दत्तू जाधव, मारुती जाधव, बाबू मस्कार, प्रकाश राजाई, प्रकाश मानमोडे, अनिल मायाण्णा, मंजू गडकरी, यल्लाप्पा सनदी, अजित जाधव, दुधप्पा संधी, नंदकुमार जाधव, शहाजी कुट्रे, गोपाळ कुट्रे, महेश कुट्रे आदींसह शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते.