belgaum

कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या महत्त्वाकांक्षी अन्नभाग्य योजनेसाठी तांदूळ खरेदी आवश्यक आहे. तथापि केंद्र सरकारने भारतीय अन्न महामंडळाला तांदूळ विकण्यास मनाई केली आहे. यावरून भाजपचे व्देशाचे राजकारण आणि गरिबांच्या विरोधी धोरण स्पष्ट होते.

याच्या विरोधात कर्नाटक काँग्रेसतर्फे येत्या मंगळवारी 20 जून रोजी राज्यातील प्रत्येक जिल्हा केंद्राच्या ठिकाणी आंदोलन छेडून निषेधासह जनजागृती केली जाईल, अशी माहिती केपीसीसी अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आज दिली.

बेंगलोर येथे केपीसीसी कार्यालयामध्ये आज शुक्रवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. काँग्रेस सरकार अन्नभाग्य योजनेअंतर्गत दरमहा 10 किलो तांदळाचे मोफत वितरण करणार आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना डी. के. शिवकुमार म्हणाले, काँग्रेसने पाच गॅरंटी योजनांची घोषणा केली आहे.

या योजनांच्या अंमलबजावणीवर विरोधी पक्षसह अनेकांनी टीका केली. मात्र काँग्रेसने सत्तेवर येताच पहिल्या दिवसापासून या योजनांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात करून आपण आपल्या आश्वासनाशी कटिबद्ध आहोत हे दाखवून दिले आहे. विरोधी पक्षाच्या टिकेला आम्ही आमच्या कृतीतून उत्तर देऊ.

कर्नाटक सरकारने भारतीय अन्न महामंडळाकडे (एफसीआय) 2.28 लाख मेट्रिक टन धान्याची मागणी केली आहे. त्यावर एफसीआयने 12 जून रोजी दोन पत्रे पाठवत साधारण 2.22 लाख मेट्रिक टन तांदूळ देण्याची तयारी दाखवली होती. मात्र या पत्राच्या एक दिवसानंतर केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने भारतीय अन्न महामंडळाला तांदूळ आणि गव्हाची विक्री करणे बंद करा असे निर्देश दिले असल्याचे समजते.

मतदारांनी भाजपच्या भ्रष्ट सरकारला नाकारले आहे. त्यांनी गरिबांवर अन्याय केला आहे. त्यांच्या पोटावर पाय आणला आहे. भाजप गरिबांवर अन्याय आणि त्यांचा विश्वासघात करणारा पक्ष बनला आहे.

यासाठीच राज्य काँग्रेसतर्फे भाजपचे व्देशाचे राजकारण आणि गरिबांच्या विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी येत्या मंगळवारी 20 जून रोजी राज्यातील सर्व जिल्हा केंद्रांच्या ठिकाणी काँग्रेस पक्ष आंदोलन छेडून जनजागृती केली जाणार आहे, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.