Thursday, December 26, 2024

/

दक्षिणायन सुरू; आजचा दिवस सर्वात मोठा दिवस

 belgaum

पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. या परिक्रमेत आज पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास वेळ लागणार असल्यामुळे आज बुधवारी 13 तास 13 मिनिटांचा दिवस असणार आहे. थोडक्यात आजचा दिवस वर्षातला सर्वात मोठा दिवस असणार असून आज उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू झाले आहे.

दरवर्षी 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. दिवस 13 तास 13 मिनिटांचा असतो. पृथ्वी अक्षयवृत्त साडे तेवीस अंशाने कलल्याने 11000 किलोमीटर प्रति तासाच्या गतीने पश्चिमेकडून पूर्व दिशेला फिरते. यासोबत पृथ्वी आपल्या कक्षेतून 1 लाख 5 हजार किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने सुमारे 89 कोटी 40 लाख किलोमीटर लंबवर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करते. वर्षातील आजचा जसा सर्वात मोठा दिवस आहे तसा वर्षातला सर्वात लहान दिवस 22 डिसेंबर आहे. हा दिवस 10 तास 41 मिनिटे असेल तर रात्र 13 तास 19 मिनिटे असणार आहे. या दिवसाला विंटर साॅल्सटिस म्हटले जाते. 22 डिसेंबर या दिवसापासून दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते.

पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग हा कमी कमी होत आहे. दक्षिण भारतात 2004 मध्ये जी त्सुनामी झाली. त्यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग हा 3 मायक्रो सेकंद कमी झाला आहे. ठराविक वर्षानंतर आंतरराष्ट्रीय घड्याळात लीप सेकंद ॲडजस्ट करावा लागतो. 1972 मध्ये सर्वात प्रथम लीप सेकंद ॲडजस्ट केला होता. इंटरनॅशनल अर्थ रोटेशन अँड रेफरन्स सिस्टीम सर्व्हिस ही आंतरराष्ट्रीय संघटना लीप सेकंद ॲडजस्ट करते. दरवर्षी 30 जूनच्या मध्यरात्री किंवा 31 डिसेंबरच्या मध्यरात्री लीप सेकंद ॲडजस्ट केला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.