महाराष्ट्रातून कर्नाटकाला पाणी सोडण्यास तेथील शेतकऱ्यांकडून होत असलेला विरोध लक्षात घेऊन आपण तेथील सरकार सोबत चर्चा करणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज सोमवारी कृष्णा या आपल्या घरच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिली.
महाराष्ट्रातील नद्यांचे पाणी कर्नाटकात सोडण्यास तेथील शेतकरी विरोध करत आहेत. याबाबत तुम्हाला काय म्हणायचे आहे? या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या संदर्भात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची बोलणे गरजेचे असून त्याकरिता मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे.
त्याचप्रमाणे म्हादईच्या विषयाबाबत पंतप्रधानांनी कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र तुमच्यात मध्यस्थी करून समस्या सोडवली पाहिजे. तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांनी चर्चा केली पाहिजे.
जेणेकरून या राज्यांमध्ये पाण्याची समस्या निकालात निघेल. आपण सर्वजण भारत देशात राहतो. सर्व राज्यांना पाणी हवे. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करून समस्या सोडवावयास हवी, असे मत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केले.