Tuesday, January 14, 2025

/

नूतन आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी स्वीकारली अधिकार पदाची सूत्रे

 belgaum

बेळगाव महापालिकेचे नूतन आयुक्त म्हणून नियुक्ती झालेल्या अशोक दुडगुंटी यांनी आज मंगळवारी सकाळी अधिकार पदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सामावून घेऊन एकत्रित काम करण्यात येईल अशी ग्वाही दिली.

बेळगाव महापालिकेचे मावळते आयुक्त डाॅ. रुद्रेश घाळी यांच्याकडून अशोक दुडगुंटी आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी डॉ. घाळी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे नगरसेवक, महापालिकेच्या कर्मचारी संघटना आणि इतर सामाजिक संघटनांनी अभिनंदन करून नूतन आयुक्त दुडगुंटी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

महापालिकेत चांगल्या प्रकारे कार्य करण्यासाठी आपल्याला सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. या आधी देखील आपण बेळगाव महापालिकेचे कामकाज हाताळले आहे. त्यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी संघटित होऊया, असे आयुक्त दुडगुंटी यावेळी बोलताना म्हणाले.Ashok ccb commissinor

याप्रसंगी प्रशासन उपायुक्त भाग्यश्री हुग्गी, अधीक्षक अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर, आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ, महसूल उपायुक्त प्रशांत हणगंडी आदी उपस्थित होते.

नूतन मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी दुसऱ्यांदा आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे. यापूर्वीही त्यांनी जवळपास 2 वर्षे बेळगाव महापालिका आयुक्त म्हणून सेवा बजावली होती.

दरम्यान मावळते आयुक्त डॉ. घाळी यांची बदली झाली असली तरी त्यांची अद्याप दुसरीकडे नियुक्ती झालेले नाही. नियुक्ती होईपर्यंत त्यांना राजधानी बेंगलोर येथे हजर रहावे लागणार आहे.

मराठी नगरसेवकांनी देखील  नूतन मनपा  आयुक्तांचे स्वागत केले नगरसेविका वैशाली भातकांडे  शिवाजी मंडोळकर् आदींनी स्वागत केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.