Saturday, December 21, 2024

/

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ‘भार’ एकदिवसासाठी कमी होणार!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : विद्यार्थ्यांना अभ्यासाचा भार अधिक वाटत असतो म्हणूनच कि काय यापेक्षाही अधिक ओझे त्यांच्या पाठीवरील दप्तराचे असते. दप्तराच्या या ओझ्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पाठीचे आणि मणक्याचे आजार झाल्याचे या आधी अनेकवेळा निदर्शनात आले आहे. मात्र आता विद्यार्थ्यांवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिक्षण खात्याने पावले उचलली आहेत. विद्यार्थ्यांच्या उंची आणि वजनानुसार त्यांच्यावर दप्तराचे ओझे निर्धारित केले जाणार असून दर शनिवारी ‘नो बॅग डे’ साजरा करण्याच्या सूचना देखील लवकरच केल्या जाणार आहेत.

पहिली व दुसरीसाठी १.५ ते २ किलो, तिसरी ते पाचवी साठी २ ते ३ किलो, सहावी ते आठवीसाठी ३ ते ४ किलो, नववी ते दहावीसाठी ४ ते ५ किलो अशा पद्धतीने दप्तराचे ओझे निर्धारित करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून आठवड्यातील एक दिवस ‘नो बॅग डे’ साजरा केला जात आहे. कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षे शाळा बंद असल्याने ‘नो बॅग डे’ ही संकल्पना मागे पडली होती.

मात्र, गेल्यावर्षीपासून शाळांना पुन्हा नियमितपणे सुरुवात झाल्यामुळे ‘नो बॅग डे’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचप्रमाणे या शैक्षणिक वर्षीही हा उपक्रम साजरा केला जाणार आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे वाढत आहे. कमी वयातील विद्यार्थ्यांवर दप्तराचे ओझे पडत असल्याने अनेकदा वर्षीही हा उपक्रम साजरा केला जाणार आहे.

शिक्षण खात्याच्या माहितीनुसार ‘नो बॅग डे’ दर शनिवारी असणार असून सर्व शाळांनी याबाबतच्या सूचना विद्यार्थी व पालकांना कराव्यात, अशी सूचना शिक्षण खात्यातर्फे लवकरच केली जाणार आहे. काही वर्षांपासून सातत्याने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे वाढत आहे. कमी वयातील विद्यार्थ्यांवर दप्तराचे ओझे पडत असल्याने अनेकदा विद्यार्थ्यांना अधिक वजनाचा ताण पडतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाठदुखी व इतर प्रकारच्या समस्या उद्भवतात. याची दखल घेऊन आठवड्यातील एक दिवस विद्यार्थी दप्तर घरी ठेवून येतील.

विद्यार्थांच्या वजन व उंचीनुसार दप्तराचे वजन ठरविण्यासाठी शाळा सुधारणा कमिटीला देखील विश्वासात घ्यावे, अशी माहिती देण्यास आली असून शनिवारी एक दिवस विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली वह्या व पुस्तकेच विद्यार्थ्यांना आणावी लागणार आहेत. त्यामुळे एक दिवसासाठी का होईना विद्यार्थ्यांच्या पाठीवरचा भार हलका होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.