बेळगाव लाईव्ह : शहरातील बी. एस. येडीयुराप्पा मार्गावर अलीकडे ड्रेनेज पाईपलाईन घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून हे काम थांबवून अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आले आहे. पाईपलाईन घालण्यासाठी रस्त्याला लागून मोठी चर खोदण्यात आली असून तरी ती दगड मातीचा ढिगारा रस्त्यावर टाकण्यात आला आहे.
या धोकादायक परिस्थितीसंदर्भात ‘बेळगाव लाईव्ह’ ने मंगळवारी (दि. २०) वृत्त प्रसारित केले होते. रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झालेल्या त्या धोकादायक ठिकाणचे काम अखेर बुधवारी (दि.२१) सुरू करण्यात आले आहे. बेळगाव live ने सदर वृत्त प्रसारित करताच प्रशासनाने त्याची दखल घेत अर्धवट अवस्थेत पडून राहिलेले काम अखेर सुरू करण्यात आल्याने याबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
‘येडीयुराप्पा मार्गाची धोकादायक स्थिती : लक्ष देण्याची मागणी’ या मथळ्याखाली बेळगाव live ने मंगळवारी वृत्त प्रसारित केले होते त्याची दखल घेत बुधवार पासून ‘ तो’ धोकादायक खड्डा बुजवून काम सुरू करण्यात आले आहे.
दिवसा रस्त्यावर पडलेला मातीचा ढीग आणि खोदलेली चर वाहन चालकांना दिसत असली तरी रात्रीच्या वेळी अंधारात या ठिकाणी एखादा गंभीर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती म्हणून बेळगाव live यावर आवाज उठवला होता. त्याची दखल प्रशासनाने घेतली असून तातडीने आजपासून हे काम हाती घेण्यात आले आहे.
आता पावसाळा केंव्हाही सुरू होऊ शकतो. जर तसे झाल्यास येडीयुराप्पा मार्गावरील हे खोदकाम अधिकच धोकादायक ठरणार होते. कारण पावसामुळे माती रस्त्यावर वाहून सर्वत्र दलदलीचे निसरडे साम्राज्य पसरणार होते. जे वाहन चालकांसाठी विशेषतः दुचाकी वाहन चालकांसाठी अपायकारक ठरण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
त्यामुळे लोकप्रतिनिधींसह संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बी. एस. येडीयुराप्पा मार्गावरील ड्रेनेज पाईपलाईन घालण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे अशी मागणी करण्यात येत होती. अखेर हे काम सुरू करण्यात आल्याने या मार्गावरून मार्गस्थ होणाऱ्यांकडून कडून समाधान व्यक्त केले जात आहे.
येडीयुराप्पा मार्गाची धोकादायक स्थिती : लक्ष देण्याची मागणी