Saturday, December 21, 2024

/

गोमांतकीय कवींचा बहारदार कार्यक्रम उस्फुर्त प्रतिसादात

 belgaum

लोकमान्य ग्रंथालय, शब्द गंध कवी मंडळ, वाङमय चर्चा मंडळ, सरस्वती वाचनालय, राणी पार्वतीदेवी कला व वाणिज्य महाविद्यालय मराठी विभाग, मंथन महिला मंडळ सामाजिक संस्थेतर्फे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गोव्याहून आलेल्या सात कवि -कवयित्रींचा काव्यवाचनाचा बहारदार कार्यक्रम नुकताच उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.

अनगोळ येथील लोकमान्य ग्रंथालयाच्या साने गुरुजी सभागृहात नुकताच लोकमान्य ग्रंथालयात हा कार्यक्रम झाला. सदर कार्यक्रमात कवी मोहनराव कुलकर्णी, कवी प्रा. प्रकाश क्षिरसागर, कवयित्री प्रा. चित्रा क्षीरसागर, कवयित्री प्रा. शर्मिला प्रभू, कवयित्री अंजली चितळे, कवयित्री आसावरी कुलकर्णी, कवयित्री रजनी रायकर यांनी सहभाग घेतला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वांग्मय चर्चा मंडळाचे ज्येष्ठ कार्यकारणी अनिल पाटणेकर हे होते. प्रारंभी प्रास्ताविक लोकमान्य ग्रंथालयाचे प्रमुख जगदीश कुंटे यांनी केले. शब्दगंध कवी मंडळाच्या कवयित्री अश्विनी ओगले यांनी सर्वांचे स्वागत केले.

“नजर से नजर मिला के देखो,दिल की बात बता के तो देखो” अशी सुरुवात करीत सौ.चित्रा क्षीरसागरजीनी आपल्या टीमसह कविता व सुत्रसंचलनाद्वारे काव्य संध्या रंगतदार केली. सर्व संस्थांच्या प्रतिनिधींनी कवींचे पुष्प व पुस्तक देउन स्वागत केले. प्रा.अंजली चितळे, श्रीमती आसावरी कुळकर्णी, श्रीमती रजनी रायकर, शर्मिला प्रभू, चित्रा क्षीरसागर, मोहनराव कुलकर्णी आणि श्री.प्रकाश क्षीरसागर यांनी गोव्याच्या मातीशी, संस्कृतीशी आणि सद्य परिस्थिती संबंधी सुंदर कविता सादर केल्या. या सर्वांनी वेगवेगळ्या गोमंतकीय कवितेतून गोव्यातील सारे भावा विश्वास उलगडून दाखविले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे राणी चन्नम्मा विद्यापीठाचे निवृत्त मराठी विभाग प्रमुख डॉ विनोद गायकवाड, प्रा. अनिल परणेकर, प्रा. सुभाष सुंठणकर, साहित्यिका माधुरी शानभाग, प्रा. स्वरुपा इनामदार यांच्यासह प्रा. निलेश शिंदे, प्रा. अशोक अलगोंडी, सुधीर जोगळेकर, किशोर काकडे, वंदना कुलकर्णी, अश्विनी ओगले, रेखा गद्रे, उर्मिला शहा, व्हि. इस. वाळवेकर, चंद्रशेखर गायकवाड, आरती आपटे, रंजना कारेकर, अनिल पाटील, उदय पाटील पाटील, अजित पाटील, श्रीधर पाटील, हर्षदा सुंठणकर, प्रा. परसू गावडे, अस्मिता आळतेकर, सुधाकर गावडे, राजाराम हलगेकर, सुधीर जोगळेकर, रंजना कारेकर, पुष्कर ओगले, तसेच लोकमान्य ग्रंथालय, वांडग्मय चर्चा मंडळ, शब्दगंध कवी मंडळ, वरेरकर नाट्य मंडळ, सरस्वती वाचनालय, मंथन महिला मंडळ व सामाजिक संस्था या सर्व संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी, शहरातील कवी -कवयित्री,

शिक्षक प्राध्यापक, विद्यार्थी पालक आणि रसिक हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रा. अशोक अलगोंडीनी मानले. सदर कार्यक्रम हाऊसफुल्ल झाला. सर्व कविंनी सर्व संस्थांचे व बेळगावकरांचे आभार मानले. सर्व कवी हे स्वतः उद्योजक अथवा चांगल्या पदांवर काम करीत असून, अनुभवी व अनेक पुस्तकांचे कवी-लेखक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.