बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील आता प्रादेशिक आयुक्त पदाचा अतिरिक्त प्रभार देखील सांभाळणार आहेत. राज्य सरकारने बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना प्रभारी प्रादेशिक आयुक्त अशी नियुक्ती केली आहे.
नुकताच प्रादेशिक आयुक्त एम जी हिरेमठ सेवा निवृत्त झाले होते त्या नंतर उत्तर कर्नाटकातील महत्त्वाचे मानले जाणारे हे पद वरिष्ठ अधिकारी म्हणून बागलकोट जिल्हाधिकारी सुनील कुमार यांच्या कडे प्रभार सोपवण्यात आला होता मात्र सुनील कुमार यांची बदली झाल्याने हे पद रिक्त होते त्या जागी नितेश पाटील यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
३१मे रोजी एम जी हिरेमठ सेवा निवृत्त झाले होते राज्य शासनाने कायम स्वरुपी प्रादेशिक आयुक्त नियुक्त केला नव्हता बागलकोट डी सी यांच्या कडे प्रभार होता.
नितेश पाटील हे बेळगावचे जिल्हाधिकारी आहे त्यांच्या कार्यालया शेजारीच प्रादेशिक आयुक्त कार्यालय आहे त्यामुळे पाटील यांच्या कडे प्रभार दिल्याने सोयीचे ठरणार आहे.