बेळगाव सह आसपासच्या परिसरात अनेक धबधबे आणि पावसाळा सुरू झाल्यावर धबधबे पाणी पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. दरवर्षी प्रमाणे यंदाही दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाने पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षिततेचा विचार करून दुधसागर धबधब्यावर जाण्यास बंदी घातली आहे.
त्यात भर म्हणून आता गोवा वन विभागाने कुळे येथून पर्यटकांना दूधसागर कडे जाण्यासाठी बंदीचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे कर्नाटक,महाराष्ट्र तसेच गोव्यातील पर्यटकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
काही वर्षांपूर्वी दिवंगत रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांनी दूधसागर धबधबा पाहण्यासाठी सुविधा पर्यटकांना दिली होती. या ठिकाणी जाण्यासाठी बेळगाव येथून लोकल ट्रेनही सोडण्यात आली होती. परंतु काही काळानंतर धबधब्यावर जाण्यासाठी बंदी घालण्यात आली.
लोकल ट्रेनही बंद करण्यात आली. त्यानंतर प्रत्येक पावसाळ्यात पर्यटक मोठ्या संख्येने बंदी आदेश डावलून दुधसागर धबधब्याचा आनंद घेण्यासाठी जात असत. मात्र अनेक वेळा धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना रेल्वे पोलिसांकडून लाठीचा मार खाणे भाग पडत होते
गोवा हद्दीतून कुळे मार्गे दूध सागरला जाण्यासाठी स्थानिकांच्या वाहनांचा पर्यटक वापर करतात. परंतु पावसात नदीपात्रात पाणी अधिक असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने गोवा वनविभाग दर वर्षी दुधसागर बंदीचा आदेश काढतात.