Thursday, December 26, 2024

/

डायनॅमिक मॅन्युफॅक्चरिंग इंडियाच्या कव्हर पेजवर अरविंद मेल्लिगेरी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या औद्योगिक क्षेत्राच्या कामगिरीची कीर्ती देशासह संपूर्ण जगात पसरली आहे. बेळगावच्या उद्योजकांची दखल जगभरात विविध ठिकाणी आजवर घेण्यात आली असून औद्योगिक यंत्रसामग्रीची इत्यंभूत माहिती देणाऱ्या ‘डायनॅमिक मॅन्युफॅक्चरिंग इंडिया’ या पाक्षिकानेदेखील बेळगावच्या एक्कस कंपनीचे सीईओ अरविंद मेल्लिगेरी यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ‘कव्हर स्टोरी’ प्रकाशित केली आहे.

प्रत्येक विमानाचा कोणता ना कोणता भाग बेळगावमध्ये बनला आहे, हे मी अभिमानाने सांगतो’ असे उदगार कव्हर पेजवर अरविंद मेल्लिगेरी यांच्या नावे प्रकाशित करण्यात आले आहेत. अरविंद मेल्लिगेरी हे बेळगावमधील एक्कस या कंपनीचे सीईओ आहेत. हि कंपनी एरोस्पेस, खेळणी आणि ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन घेते.

अरविंद मेल्लिगेरी यांनी नाविन्यपूर्ण धोरणांद्वारे दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्यावर लक्ष्य केंद्रित केले असून मॅन्युफॅक्चरिंगच्या भिन्न दृष्टिकोनामुळे देशांतर्गत मूल्यवर्धन वाढवून जागतिक स्तरावर स्पर्धात्मक फायदा मिळवला आहे. गेल्या दशकात त्यांनी अनुलंब एकात्मिक एरोस्पेस इकोसिस्टम (A vertically integrated aerospace ecosystem) तयार केली आहे. या अनोख्या इकोसिस्टमला २०१६ साली प्रतिष्ठित “ग्लोबल एअरबेस इनोव्हेशन अवॉर्ड” प्रदान करण्यात आला असून आणि हा प्रयोग जगातील अशा प्रकारचा पहिला प्रयोग म्हणून ओळखला गेला. एक्कस कंपनीने ग्राहकांची विश्वासार्हता जपत भारत, फ्रान्स आणि युनायटेड स्टेट्समधील उत्पादन सुविधांमध्ये ५००० हुन अधिक लोकांशी जोडली गेली आहे. Arvind malligeri

अरविंद मेल्लीगेरी यांच्या दृढ नेतृत्वामुळे तसेच जागतिक कंपन्यांसोबतच्या धोरणात्मक सहकार्यामुळे एक्कस कंपनीला त्यांनी जागतिक स्तरावर पोहोचवले आहे. एक्कस या बेळगावस्थित कंपनीने कोप्पळ टॉय क्लस्टर (KTC), कोप्पळ येथे भारतातील पहिले ४०० एकर खेळणी उत्पादन इकोसिस्टम आणि हुबळी ड्युरेबल गुड्स क्लस्टर (HDC) विकसित केले आहे.

अरविंद मेल्लीगेरी यांच्या औद्योगिक क्षेत्रातील कामगिरीमुळे त्यांना डायनॅमिक मॅन्युफॅक्चरिंग इंडियाच्या कव्हर पेजवर स्थान देण्यात आले असून हि बाब बेळगावच्या औद्योगिक क्षेत्रासाठी कौतुकास्पद ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.