Daily Archives: Jun 30, 2023
बातम्या
“ॲग्री किसान ड्रोन” करणार शेत पिकांची फवारणी
शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकांवर रासायनिक खतांची फवारणी करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. याचे प्रारंभीचे प्रात्यक्षिक बेळगाव तालुक्यातील कडोली गावात नुकतेच पार पडले.
देशात "ॲग्री किसान ड्रोन"चे उत्पादन करणारी गरुडा एरोस्पेस ही नामांकित...
बातम्या
डायनॅमिक मॅन्युफॅक्चरिंग इंडियाच्या कव्हर पेजवर अरविंद मेल्लिगेरी
बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या औद्योगिक क्षेत्राच्या कामगिरीची कीर्ती देशासह संपूर्ण जगात पसरली आहे. बेळगावच्या उद्योजकांची दखल जगभरात विविध ठिकाणी आजवर घेण्यात आली असून औद्योगिक यंत्रसामग्रीची इत्यंभूत माहिती देणाऱ्या 'डायनॅमिक मॅन्युफॅक्चरिंग इंडिया' या पाक्षिकानेदेखील बेळगावच्या एक्कस कंपनीचे सीईओ अरविंद मेल्लिगेरी...
बातम्या
महसूल मंत्र्यांच्या उपस्थितीत विभागस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक
बेळगाव लाईव्ह : शुक्रवारी सुवर्ण विधान सौध येथे जिल्हाधिकारी आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महसूल विभागाची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महसूलमंत्री कृष्णा भैरेगौडा होते.
यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना महसूलमंत्री कृष्णा भैरेगौडा म्हणाले, शासनाच्या प्रशासकीय व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून...
बातम्या
रिंग रोड सर्वेक्षणास आलेल्या पथकाला माघारी पिटाळले
बेळगाव शहराच्या रिंग रोडसाठी सुपीक शेत जमीन संपादन करण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. त्या अनुषंगाने रिंग रोडसाठी सर्वेक्षण करण्यास आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाला शेतकऱ्यांनी विरोध करून माघारी पिटाळून लावल्याची घटना आज दुपारी गोजगा (ता. जि. बेळगाव) येथे घडली
जिल्हा...
बातम्या
शहरात शालेय मुलांची आषाढी वारी अपूर्व उत्साहात
आषाढी एकादशी निमित्त शहरातील मराठा मंडळ जिजामाता हायस्कूल, मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूल आणि मराठा मंडळ हायस्कूल या तीनही शाळांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी -विद्यार्थिनींची आषाढी वारी आज सकाळी अपूर्व उत्साहात पार पडली.
मराठा मंडळ जिजामाता हायस्कूल चव्हाट गल्ली येथून आज...
बातम्या
भाग्यनगर येथील गुलमोहर झाडाची खुलेआम कत्तल
भाग्यनगर येथील ब्रह्मकुमारी केंद्रानजीक असलेल्या रस्त्या शेजारील एका पूर्ण वाढ झालेल्या गुलमोहोराच्या झाडाची आज सकाळपासून खुलेआम कत्तल सुरू झाली असून याबद्दल वृक्षप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बेसुमार वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढळू लागला आहे. यंदा प्रदीर्घ लांबलेला मान्सूनचा पाऊस हे...
बातम्या
अन्नभाग्य योजनेची उद्यापासून अंमलबजावणी
राज्यातील काँग्रेस सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या पाच गॅरंटी योजनांपैकी अन्नभाग्य योजना ठरल्याप्रमाणे उद्या 1 जुलैपासून राज्यभरात सुरू होणार असल्याचे अन्नपुरवठा खात्याचे मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी स्पष्ट केले आहे.
बेंगलोर येथे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मंत्रि मुनियप्पा यांनी अन्नभाग्य योजना उद्यापासून...
बातम्या
जमीनवादातून तुंबळ हाणामारी; 10 जण जखमी
न्यायप्रविष्ठ शेत जमिनीच्या वादातून दोन गटात तलवारी, लाठ्या-काठ्या घेऊन झालेल्या तुंबळ हाणामारीमध्ये 10 जण जखमी झाल्याची घटना बेकिनकेरे (ता. जि. बेळगाव) येथे काल गुरुवारी घडली. फक्त हाणामारी करून न थांबता एका गटाने दुसऱ्या गटाची भात पेरणी केलेली शेती नांगरून...
Latest News
जुन्या आठवणींना उजाळा देत साजरा केला शाळेचा वर्धापन दिन
बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील 140 वर्षें जाणत्या शाळेतून घडलेल्या एकूण 133 सातवीच्या बॅचचे ऐश्वर्य असलेल्या व ज्या हलगा...