Thursday, December 19, 2024

/

बेळगावात 11 जूनला विश्वभारती मॅरेथॉन -2023

 belgaum

कारगिल युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्याच्या उद्देशाने व माजी सैनिकांच्या आग्रहाखातर विश्वभारती कला क्रीडा संघटनेच्या माध्यमातून बेळगाव येथे येत्या 11 जून रोजी विश्वभारती मॅरेथॉन -2023 या भव्य धावण्याच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे येथील शरहरद फाउंडेशन या संस्थेमार्फत दरवर्षी 16 सप्टेंबरला गेली 5 वर्ष ही शर्यत आयोजित केली जाते आणि त्यांच्या प्रेरणेने विश्वभारती कला क्रीडा संघटनेने ही शर्यत आयोजित केली आहे. या स्पर्धेतील विजयी धावपटूंना कारगिल येथील 16 सप्टेंबर 2023 या कारगिल मॅरेथॉनमध्ये सहभाग होण्याची संधी मिळणार आहे. बेळगाव येथे येत्या 11 जून रोजी ही शर्यत पहिल्यांदाच आयोजित केली जात आहे. शर्यतीतील विजयी उमेदवारांना आकर्षक बक्षिसे देण्याबरोबरच धावण्याचे चांगले प्रशिक्षण घेण्याची संधी संघटनेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी या संधीचा सर्व होतकरू धावपटूंनी लाभ करून घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

बेळगाव येथील मॅरेथॉन शर्यतीची माहिती पुढील प्रमाणे आहे. 1) फुल मॅरेथॉन 42.195 कि. मी. अंतराची असेल. खुल्या गटाच्या शर्यतीसाठी वयोमर्यादा 18 वर्षावरील आणि प्रवेश फी प्रत्येकी 700 रु. असणार आहे. 2) हाफ मॅरेथॉन 21 कि. मी. अंतराची असेल. पुरुष व महिला गट (18 वर्षांवरील), प्रवेश फी 600 रु. 3) 10 कि. मी. पुरुष व महिला गटासाठी (18 वर्षावरील ), प्रवेश फी 500 रु. 4) 10 कि. मी. अंतर पुरुष व महिला गट (वयोमर्यादा 35 वर्षावरील), प्रवेश फी 500 रुपये. 5) ड्रीम मॅरेथॉन सर्वांसाठी खुली, प्रवेश फी 300 रुपये. नाव नोंदणी प्रसंगी मेडिकल सर्टिफिकेट, आधार कार्ड, डिजिटल पेमेंट सुविधा आवश्यक आहे.

सदर शर्यतीतील विजय त्यांना आकर्षक रोख बक्षिसे मिळणार नसली तरी प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना कारगिल मॅरेथॉन -2023 मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याची संधी मिळणार हे विशेष होय. त्याचप्रमाणे संबंधित विजेत्यांचे दोन‌ महिन्यांचे प्रशिक्षण व येण्या -जाण्याचा सर्व खर्च विश्व भारती कला क्रीडा फाउंडेशन उचलणार आहे. तरी बेळगाव येथे आयोजित मॅरेथॉन शर्यतीमध्ये हौशी तसेच व्यावसायिक धावपटूंनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन देशप्रेम प्रकट करावे, असे आवाहन आयोजक विश्व भारती कला क्रीडा फाउंडेशन बेळगाव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.