Thursday, December 19, 2024

/

शिवजयंती मिरवणुकी निमित्त असा असेल रहदारीत बदल

 belgaum

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून शनिवारी बेळगाव शहरात होणाऱ्या चित्ररथ मिरवणुकीत होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस खात्याने शहरातील रहदारी च्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणूकीची सुरुवात शहरातील नरगुंदकर भावे चौक येथून प्रारंभ होणार आहे असून मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, कॉलेज रोड या मार्गावर बेळगाव पोलीस आयुक्तांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. मिरवणूक धर्मवीर संभाजी महाराज सर्कल, रामलिंगखिंड गल्ली, सम्राट अशोक चौक, हेमुकलानी चौक, शनी मंदिर, कपिलेश्वर आरओबी मार्गे कपिलेश्वर मंदिराजवळ संपेल.

दुपारी 02.00 ते मिरवणूक संपेपर्यंत खालील रस्त्यांवर नो पार्किंग

मिरवणुकीचा मार्ग नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ला, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, कॉलेजरोड, धर्मवीर संभाजी महाराज सर्कल, रामलिंगखिंड गल्ली, हेमुकलानी चौक, शनिमंदिर, रेणुका मान हॉटेल, कपिलेश्‍वर सर्कलपर्यंतच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याने.

चन्नम्मा सर्कल ते कॉलेज रोड आणि दोन्ही बाजूच्या रस्त्यांवरील बोगारवेस पर्यंत दिनांक: 27/05/2023 पासून 04.00 वाजेपासून नो पार्किंग.

वाहतूक व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी दिनांक: 27/05/2023 रोजी दुपारी 02.00 ते मिरवणूक संपेपर्यंत, खालील प्रमाणे वाहन वाहतूक मार्ग बदलण्यात आला असून जनतेने पर्यायी मार्गाचा वापर करावा अशी विनंती करण्यात येत आहे.

खानापूरच्या दिशेने राणी चन्नम्मा सर्कल

सर्व वाहने कॅम्प – गांधी सर्कल (अर्गन तलाबा, शौर्य चौक) मार्गे क्लब रोड, केंद्रीय विद्यालय क्रमांक २, ग्लोब थिएटर मार्गे जातील.

सर्कलमधून खानापूर रस्त्याला जोडून पुढे जाऊ शकतात

जिजामाता सर्कलकडून देशपांडे पेट्रोलपंप, नरगुंदकर भावे चौक, कंबळी खुटा, पिंपळा कट्टा, पाटील गल्लीकडे जाणारी वाहने थेट जिजामाता सर्कलवरून जुना पीबी रोडमार्गे जातील.

गोवेस सर्कल आणि नाथ पाई पाण्याची सर्कल येथून कपिलेश्वर फ्लायओव्हर रोडने बँक ऑफ इंडियाकडून जाणारी वाहने बँक ऑफ इंडिया सर्कलकडून शिवचरित्र रोड, वैभव हॉटेल, जुना पीबी रोडकडे जातील.

जुना पीबी रोड, यश हॉस्पिटल, महाद्वार रोड, कपिलेश्वर मंदिर मार्गे कपिलेश्वर आरओबीकडे जाणारी वाहने यश हॉस्पिटलजवळ डावीकडे वळण घेऊन भातकांडे शाळा तानाजी गल्ली रेल्वे गेटमार्गे पुढे जातील.

खानापूर रोड, बीएसएनएल स्टेशन रोड आणि गोगटे सर्कल मार्गे रेल्वे स्टेशन, पोस्टमन सर्कल मार्गे शनि मंदिराकडे जाणारी वाहने ग्लोब सर्कल, केंद्रीय विद्यालय क्र.2 जवळ डावीकडे वळण घेतात. शौर्य चौक गांधी सर्कल, क्लब रोड, चन्नम्मा सर्कल व पुढे सरकतील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.