बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष सीमाभागाकडे लागले आहे. बेळगावमधील उत्तर, दक्षिण, ग्रामीण, खानापूर, यमकनमर्डी या पाचही मतदार संघात महाराष्ट्र एकीकरण समितीने एकमेव अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविल्याने राष्ट्रीय पक्षांनाही याची धास्ती लागली आहे. बेळगावमध्ये सध्या सोशल मीडिया कॅम्पेनिंगच्या माध्यमातून धुमाकूळ घालणाऱ्या रमाकांत कोंडुसकर यांचा प्रचार आता थेट ऑस्ट्रेलियातही पोहोचला असून ऑस्ट्रेलियास्थित बेळगावकरांनीही याची दखल घेतली आहे.
बेळगाव दक्षिण विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविणारे रमाकांत कोंडुसकर यांच्या ‘सोशल मीडिया कॅम्पेनिंग’ ने सध्या बेळगावसह सर्वत्रच धुमाकूळ घातला आहे. रमाकांत कोंडुसकरांनी आजवर केलेल्या कार्याची पोचपावती निवडणुकीपूर्वीच मतदार आणि कार्यकर्त्यांनी दिली असून आता थेट ऑस्ट्रेलिया येथील मेलबर्न मध्ये राहणाऱ्या बेळगावकरांनीही रमाकांत कोंडुसकर यांना पसंती दर्शविली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीपेक्षाही सीमाभागातील समिती उमेदवारांच्या प्रचाराचा फिव्हर सध्या अधिक चर्चेत असून परदेशात राहून देखील बेळगावमधील सर्व घडामोडी जाणून घेणाऱ्या बेळगावकरांनी रमाकांत कोंडुसकर यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीला पसंती दर्शविली आहे.
मूळच्या बेळगावच्या पण सध्या मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे कामानिमित्त वास्तव्यास राहणाऱ्या रेखा तरळे यांनीही रमाकांत कोंडुसकर यांच्या कार्याचे कौतुक करत आगामी विधानसभा निवडणुकीत रमाकांत कोंडुसकर हेच विजयी ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
बेळगावमधील निवडणुकीचा फिव्हर आता परदेशातही पोहोचला असून आजतागायत रमाकांत कोंडुसकर यांनी केलेले सामाजिक कार्य पाहता या पदासाठी तेच पात्र असून सर्वसामान्य नागरिकांचे सर्वसामान्य नेते असलेले रमाकांत कोंडुसकर यांनाच या निवडणुकीत जनता बहुमतांनी विजयी करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
परदेशात राहून देखील बेळगावमधील घडामोडींची काळजी घेणाऱ्या बेळगावकरांनी रमाकांत कोंडुसकर यांच्या कार्याची आणि त्यांच्या सोशल मीडिया कॅम्पेनिंगची दखल घेतल्याने रमाकांत कोंडुसकर यांचा प्रचार जगभर प्रसिद्ध होत चालल्याचे दिसून येत आहे.
अमेरिका इंग्लंड सह अनेक आखाती देशात राहणाऱ्या बेळगावकरानी फोन करून दक्षिण बेळगावचे समिती उमेदवार रमाकांत यांच्या प्रचाराची माहिती घेत आहेत आणि विजयी करा असे आवाहन देखील करत आहेत.
बेळगाव दक्षिणच्या कँपेनकडे परदेशातूनही नजरा | pic.twitter.com/OhmQvfWWrL
— Belgaumlive (@belgaumlive) May 1, 2023