Thursday, April 25, 2024

/

सत्तेच्या पटलावरील फॉर्म्युलाचा काँग्रेस हायकमांडचा समंजस उद्देश!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत घेऊन सत्ता स्थापन निर्णय काँग्रेस पक्षात अनेक वाटाघाटींनंतर अखेर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार असणारे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु होती. मात्र संपूर्ण विचाराअंती काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्रीपद डी. के. शिवकुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

मुख्यमंत्रीपदी दुसऱ्यांदा विराजमान झालेले सिद्धरामय्या यांच्याच नावाचा विचार हायकमांडने का केला असावा? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या सिध्दरामय्यांचा इतिहास हा कर्नाटकाच्या काँग्रेस पक्षाच्या राजकारणासाठी पुढील कालावधीत महत्वपूर्ण ठरणारा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या सिद्धरामय्या यांनी वकिली केली आहे. १९८३ साली राजकारणात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविले सिद्धरामय्या वयाने जितके मोठे आहेत तितकाच त्यांचा राजकीय प्रवासही मोठा आहे. १९९४ साली जनता दलाच्या सरकार काळात उपमुख्यमंत्रीपद काम केलेल्या सिध्दरामय्यांनी २००८ साली काँग्रेसशी हातमिळवणी केली. त्यानंतर २०१३ ते २०१८ या कार्यकाळात त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. आतापर्यंत १२ निवडणुका लढवून त्यापैकी ७ निवडणुका त्यांनी जिंकल्या आहेत. कर्नाटकाच्या राजकारणात या निवडणुकीत जनतेला पाच मोठी आश्वासने काँग्रेसकडून देण्यात आली आहेत. मात्र हि आश्वासने कशापद्धतीने पूर्ण करावीत यासाठी सिद्धरामय्या सक्षम आहेत. अर्थव्यवस्था नीटपणे हाताळण्याची क्षमता असणाऱ्या सिध्दरामय्यांना मुख्यमंत्रीपदी निवडण्यामागचा हा मोठा आणि महत्वाचा उद्देश हायकमांडने ठेवला आहे.

सिद्धरामय्या यांनी यापूर्वी मुख्यमंत्रीपदी कार्यरत असताना जनतेला अनेक सोयीसुविधा पुरविल्या आहेत. यामध्ये मोफत तांदूळ, शालेय विद्यार्थ्यांना दूध, इंदिरा कँटीन यासह गरीब जनतेसाठी अनेक योजना राबवून त्यांनी जनतेची मने जिंकली आहेत. सिद्धरामय्या काँग्रेस पक्षासाठी ‘अर्थ’पूर्ण आहेत. पक्षाला लागणाऱ्या देणग्यांचे नियोजन सिद्धरामय्या काटेकोरपणे करू शकतात असा हायकमांडला विश्वास आहे. देशभरात सुरु असलेल्या भारत जोडो आंदोलनात कर्नाटकात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. काँग्रेस पक्ष संघटनेसाठी मोलाचे योगदान दिले. भाजप सरकारच्या ४० टक्के कमिशन प्रकरणाविरोधात आवाज उठविला. ‘क्लीन फेस, क्लीन हॅन्ड’ असे समीकरण असलेल्या सिध्दरामय्यांकडे सर्वधर्म-सर्वजण-सर्वसमभाव या वृत्तीने प्रत्येकाला आपल्या प्रवाहासोबत घेऊन जाण्याची क्षमता आहे. त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराविरोधात कोणतीही तक्रार नाही. ‘अहिंद’ समजल्या जाणाऱ्या सिध्दरामय्यांनी दलितांचे, मागासवर्गीयांचे प्रतिनिधित्व सर्वाधिक केले आहे. शिवाय पक्षांनाही आपल्यासोबत घेऊन जाण्यात त्यांचा हातखंडा आहे. या सर्व गोष्टी जाणूनच हायकमांडने त्यांना कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान केले आहे.Dk. Sidhu

 belgaum

गेल्या दीड वर्षात काँग्रेस नेत्यांनी भाजपवर अनेक आरोप केले आहेत. यापैकी ४० टक्के कमिशन हा आरोप मोठ्या प्रमाणात गाजला आहे. याचदरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनीही मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला. मात्र डी. के. शिवकुमार यांच्यावर सीबीआय, ईडीच्या केसीस आहेत. डी. के. शिवकुमार यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यासाठी सीबीआय प्रमुख पदी प्रवीण सूद यांची नियुक्ती केल्याचीही चर्चा आहे.

प्रवीण सूद यांना डी. के. शिवकुमार यांच्यासंदर्भात विविध माहिती असल्याकारणाने डीकेशींवर दोषारोप दाखल करणे सोपे जाईल याच अनुषंगाने त्यांची सीबीआय प्रमुखपदी निवड करण्यात आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ज्या काँग्रेस पक्षाने भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच काँग्रेस पक्षातील नेत्यावर भविष्यात कोणते आरोप करण्यात आले तर हातात आलेल्या सत्तेवर विपरीत परिणाम होईल, या दृष्टिकोनातून काँग्रेस हायकमांडने समंजस निर्णय घेतला आहे. काँग्रेस हायकमांडचा हा ‘फॉर्म्युला’ आता कर्नाटकात किती काळ टिकतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.