Wednesday, November 27, 2024

/

पहिल्या कॅबिनेट बैठकीत आश्वासने मंजूर : सिद्धरामय्या

 belgaum

बेळगाव लाईव्ह : सत्तेवर येण्यापूर्वी काँग्रेसने राज्यात जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. या जाहीरनाम्यात गृहज्योती योजना, गृहलक्ष्मी योजना, अन्नभाग्य योजना, शक्ती योजना, बेरोजगार पदवीधर आणि डिप्लोमाधारकांसाठी योजना अशा विविध योजनांची घोषणा केली होती. काँग्रेस सरकार आता सत्तेवर आले असून हि आश्वासने कधी पूर्ण केली जाणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. आज कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या यांनी शपथ घेतली असून शपथविधी पार पडल्यानंतर सिध्दरामय्यांनी पत्रकार परिषद बोलावून यासंदर्भात अधिक माहिती दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, काँग्रेस सरकारच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत निवडणुकीपूर्वी दिलेल्या पाच हमींना तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. पुढील बैठकीत याविषयावर अधिक तपशीलवार चर्चा करून आदेश काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. गृहिणींना गृहलक्ष्मी योजनेंतर्गत दरमहा २००० रु., गृहज्योती योजनेंतर्गत २०० युनिट मोफत वीज, अन्नभाग्य योजनेंतर्गत प्रति व्यक्ती १० किलो तांदूळ, शक्ती योजनेंतर्गत महिलांसाठी मोफत बस प्रवास, बेरोजगार पदवीधरांना दरमहा ३००० रुपये, बेरोजगार डिप्लोमा पदवीधारकांना १५०० रुपये प्रति महिना देणार असल्याचे सिद्धरामय्या यांनी जाहीर केले. हमीभावाच्या अटी व शर्तींवर पुढील बैठकीत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले.Sidhramayya

जाहीरनाम्यात आम्ही जनतेला अनेक आश्वासने दिली होती. मात्र, ही केवळ एका वर्षात पूर्ण होणारी आश्वासने नाहीत. यासोबतच राज्यातील जनतेला पाच हमीभाव दिले. पहिल्या टप्प्यात आम्ही दिलेल्या ५ हमींच्या अंमलबजावणीबद्दल चर्चा करण्यात आली असून काँग्रेस जे बोलेल त्यावर ठामपणे कार्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसने दिलेली ५ आश्वासने पूर्ण करण्यासाठी ५० हजार कोटींची आवश्यकता असून केंद्राकडून यंदा ५० हजार कोटी रुपये येणे असल्याचे ते म्हणाले.

शिवाय कर्नाटकातून ४ लाख कोटी कर भरला जात असूनही कर्नाटकावर केंद्राकडून अन्याय होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेसने दिलेल्या पाच आश्वासनांना पहिल्याच कॅबिनेट बैठकीत मंजुरी जरी दिली असली तरी या आश्वासनांची अंमलबजावणी कधी होणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.