Tuesday, April 16, 2024

/

महिलांची दिशाभूल करणे हा राष्ट्रीय पक्षांचा व्यवसाय : आर. एम. चौगुले यांचा आरोप

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासूनच राष्ट्रीय पक्षांनी मतदारांना आमिष दाखवून भुलवण्याचा सपाटा सुरु केला आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागातील महिलांची विविध कारणास्तव दिशाभूल करण्यात येत असून आमिष दाखवून महिलांची दिशाभूल करणे हा राष्र्टीय पक्षांचा व्यवसाय बनला आहे, अशी टीका ग्रामीण मतदार संघाचे उमेदवार आर. एम. चौगुले यांनी केली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत सीमाभागातील पाचही जागांवर म. ए. समितीने अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. मतदार संघात मिळत असलेला मतदारांचा पाठिंबा पाहता हि निवडणूक सद्यस्थितीत म. ए. समितीने जिंकल्यातच जमा आहे. ग्रामीण भागातील वातावरण चैतन्य आणि प्रबळ दिसून येत असून मतदारांचा पाठिंबा उत्स्फूर्त दिसून येत आहे.

म. ए. समिती उमेदवाराला बहुमतांनी निवडून देण्याचा निर्धार जनतेने केला असून बेळगावमध्ये मराठीचा जागर करण्यासाठी आणि मराठीचे वर्चस्व राखण्यासाठीही वेळ आपल्याकडे चालून आली आहे. राष्ट्रीय पक्षांना मराठीची ताकद दाखवून द्यायची वेळ आली आहे.

 belgaum

सध्या ग्रामीण भागात राष्ट्रीय पक्षांकडून महिलांची मोठ्याप्रमाणात दिशाभूल करण्यात येत आहे. दुसऱ्या पक्षाचा उमेदवार निवडून आला तर रोजगार हमी योजनेतील काम, विविध पेन्शन योजना, सरकारी निधीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सरकारी योजना बंद होतील, अशी भीती महिलांना दाखविण्यात येत आहे.R m chougule

महिलांनी अशा गोष्टींना घाबरून जाऊ नये, असे आवाहन आर. एम. चौगुले यांनी केले. सरकारी योजनांच्या माध्यमातून येणार निधी ग्रामपंचायतीकडे येतो. पंचायत जी जी कामे देते त्याप्रमाणे रोजगार किंवा इतर योजना सुरु असतात. यामध्ये पंचायत पीडीओ, सहकारी, ग्रामपंचायत सदस्य, अध्यक्षांचाही सहभाग मोठा असतो. मात्र राष्ट्रीय पक्षांकडून जनतेला भीती घालून मते वळविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जर खर्च विकास केला असेल तर सरळमार्गाने राजकारण करावे, असे आव्हान त्यांनी राष्ट्रीय पक्षांना दिले आहे.

म. ए. समितीला मिळत असलेल्या तुफान पाठिंब्यामुळे राष्ट्रीय पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. जर अशापद्धतीने राजकारण करायचे असेल तर राजकारणात न उतरता सरकार ज्या योजना सुरु करते त्या योजना योग्यवेळी पुरविण्यात पुढाकार घेणे गरजेचे आहे असेही आर. एम. चौगुले म्हणाले.

जनतेची मते वळविण्यासाठी राष्ट्रीय पक्षांकडून हे खोटं नाटक करण्यात येत आहे. जर समितीच्या उमेदवाराला आमदार म्हणून निवडून दिल्यास सध्या सुरु असलेल्या रोजगारामध्ये वाढ करून रोजगार हमी योजनेचा निधीही वाढवून घेण्यात प्रयत्न करेन, १००-१२५ दिवसांऐवजी १५० ते २०० दिवस योजना आणि ४०० रुपयांपर्यंत मोबदला मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू , अशी ग्वाही त्यांनी जनतेला दिली आहे. विशेषतः महिलांना त्यांनी महत्वपूर्ण सूचना केली असून महिलावर्गाने न घाबरता समिती उमेदवाराच्या पाठीशी राहून सीमाभागातील जनतेच्या समस्या पूर्णपणे संपविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.