कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आल्यानंतर आता अनेक प्रश्न विचारले जात आहेत. कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री कोण असणार? याचीही चांगलीच चर्चा रंगली आहे.
यादरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, सिद्धरमय्या यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. तसंच पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांना राज्य मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, राज्याला तीन उपमुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे.
कर्नाटकात काँग्रेस एक मुख्यमंत्री आणि तीन उपमुख्यमंत्री असण्याची शक्यता आहे. तीन मुख्यमंत्री लिंगायत, वोक्कालिगा आणि एक दलित समाजातील असतील अशी माहिती आहे.
या तीन समाजातील उपमुख्यमंत्री नेमण्याचं कारण म्हणजे, या तिन्ही समाजातून काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मतदान झालं आहे.
दरम्यान, यामधील एक जण मुस्लीम समाजातील असू शकतो अशीही चर्चा आहे. मात्र अद्याप त्यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही.