बेळगावात वीज कोसळून दोघांचा मृत्यू
बेळगाव लाईव्ह : अथणी येथे आज सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. मृतांत एक तरुण व महिलेचा समावेश आहे.
बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील केसकरी दड्डी गावातील रहिवासी अमूल जयसिंग कानडे (वय २४) आणि विठ्ठाबाई महादेव कामकर (वय 50) या दोघांचा वीज पडून मृत्यू झाला आहे.
अमूल जयसिंग कानडे बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील अदिउड गावचा रहिवासी असून अथणी तालुक्यातील देसरहट्टी गावात आपल्या मुलीच्या घरी जात असताना हा अपघात झाल्याचे समजते.