बेळगाव:मुलगी अथवा मुलाच्या विवाहासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जात असल्यामुळे कर्जबाजारीपणा वाढत आहे. त्यामुळे सर्व समाजात सामुहिक विवाह ही काळाची गरज असल्याने जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन या संस्थेच्या वतीने सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
विविध समाजातील गरीब गरजू वधूवरांचा सामुहिक विवाह करण्यात येणार आहे. तरी गरीब गरजूंनी या संधीचा लाभ घ्यावा अशी विनंती अध्यक्ष सुनिल मुतगेकर आणि सचिव लक्ष्मण शिंदे यांनी केली आहे.
विवाह समारंभावर होणार अनावश्यक खर्च टाळण्याच्या एकमेव उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
. यावेळी सामुहिक विवाहासाठी लागणार्या संपुर्ण खर्चाची जबाबदारी जायंट्स मेन स्वीकारणार असून वधूवरांना संस्थेच्या वतीने कपडे व संसार उपयोगी वस्तू भेट म्हणून देण्यात येणार आहेत.
तरी गरजुनी ९९७२२०३७२० किंवा ९८४५३८९३५२ या नंबरवर संपर्क साधावा.